(प्रतिमांची भव्य मिरवणूक : विविध उपक्रमांचे आयोजन)1
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
सालाबादप्रमाणे या वर्षी देखील क्रांतिसूर्य, विश्वरत्न,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती तसेच विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले,छत्रपती राजर्षी शाहू महाराज,संत गाडगे बाबा,आण्णाभाऊ साठे यांची एकत्रितरित्या जयंती महोत्सव उदापूर ता:-जुन्नर येथील सारनाथनगर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
सकाळी ९ वा.धम्मध्वज पूजा,ध्वजारोहण, धम्म वंदना असे विविध कार्यक्रम पार पडले तर ध्वजारोहण करण्याचा मान ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव कुलवडे यांना मिळाला तसेच सायंकाळी सर्व महात्म्यांची प्रतिमांची भव्य मिरवणूक संपूर्ण गावांमधून काढण्यात आली.यावेळी ग्रामस्थांचा जनसमुदाय सहभागी झाला होता.
सर्व उपस्थितांचे प्रीतीभोजन झाल्यानंतर स्वर अमृत हा सदाबहार कार्यक्रम पार पडल्याची माहिती भीमदीप तरुण मंडळाचे अध्यक्ष संजय माळवे यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य अंकुश आमले,ओतूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे,सरपंच सचिन आंबडेकर,प्रभाकर शिंदे,रोहिदास शिंदे,संजय शिंदे,सागर रायकर,साधना कुलवडे,उषा सावंत,अजिज शेख,प्रकाश कुलवडे, पोलिस पाटील अमित ठोसर,राजूभाऊ अमुप,विनोद भोर, आनंदा माळवे,अशोक शिंदे,भीमदीप तरुण मंडळाचे सदस्य, समस्त ग्रामस्थ उदापूर, पुणेकर व मुंबईकर उपस्थित होते.सूत्रसंचालन संकेत शिंदे,यांनी तर आभार अजित माळवे यांनी मानले.