जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
शिरूर लोकसभा मतदार संघांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्यात लक्षवेधी लढत होणार असून,या अटीतटीच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.येत्या १३ मे रोजी या मतदारसंघात मतदानाचा अधिकार सर्व मतदार बजावणार आहेत मात्र त्यापूर्वी या दोन्हीही उमेदवार विजय आपलाच असून एकमेकांवरआरोप प्रत्याआरोपांचा धडाका सुरू झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील आमदार अतुल बेनके यांचे विश्वासू निकटवर्तीय समर्थक आणि उदापूर डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य,बबन तांबे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील हेच निवडूनयेणार असून त्यांनी सुरवातीला एक लाख रुपयांची आणि आता यासाठी पाच लाख रूपयांची पैज लावलेली आहे.व विरोधकांना सरळ सरळ आव्हान दिले की दोन साक्षीदार व रोख पाच रुपये घेऊन या निकालाच्या म्हणजे ०४ जून पर्यंत हे १० लाख डिंगोरे येथील एका संस्थेत ठेवून निकाल जाहीर झाला की ते सर्व रक्कम साक्षीदार व ग्रामस्थांच्या समोर जो जिंकेल त्याला देण्यात येईल व ती मीच जिंकेल कारण यावेळी शिवाजीदादा आढळराव हेच विजयी होतील असा पूर्ण आत्मविश्वास बबन तांबे यांना आहे.
गेल्या पाच वर्षात गायब झालेले विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे कोणी समर्थक पैज लावण्यात तयार असतील, तर त्यांनी डिंगोरे येथे येऊन माझ्याशीसंपर्क साधावा असे आवाहन केले आहे.पुढे म्हणाले की, विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे हे गेल्या पाच वर्षात मतदार संघात फिरकलेच नाहीत. आणि मतदार संघात कुठलीही कामे केलेली नाहीत.आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न आजही तोंड वासून उभा आहे.दत्तक घेतलेल्या जुन्नर तालुक्यातील उत्तरे कडे असणारे कोपरे-जांभुळशी गावाला वाऱ्यावर सोडून दिले.
याउलट मागील पाच वर्षांपूर्वी पराभूत झालेले माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी मतदारसंघात नागरिकांशी सतत संपर्क ठेवून सत्तेत नसताना देखील त्यांनी मतदार संघात निधी उपलब्ध करून विकास कामे केलेली आहेत. माजी खासदार आढळराव यांची जमेची बाजू म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांचा प्रतिसाद पाहता,महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील हेच निवडून येतील असा विश्वास व्यक्त करून पाच लाख रूपयाची पैज लावलेली आहे.