जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
उदापूर ता:-जुन्नर येथील अमुपमळा (रानमळा) येथे कवठधरी माता यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न करण्यात आला.यावेळी मांडव डहाळे,प्रतिमा मिरवणूक, मंदिरात कवठधरा देवीचा अभिषेक,उदापुचे पंत सुनिल डबीर यांचे पौरोहित्य व मंत्रोच्चारात संपन्न करूनआरती करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी महाप्रसाद आणि संगीत भजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाल्याची माहिती कवठधरी माता यात्रा उत्सव मंडळाचे अध्यक्ष रोहिदास (राजूभाऊ) अमुप यांनी दिली.
शुक्रवार दिनांक ३ मे रोजी उदापूर येथील पाराजवळ असणाऱ्या मुख्य चौकातून कवठधरा मातेच्या प्रतिमेची मोठ्या उत्साहात व भक्तिमय जल्लोष करीत मिरवणूक सुरु करण्यात आली यावेळी उत्सवाला मांडव डहाळे व प्रतिमा मिरवणूक काढून सुरुवात करण्यात आली.यावेळी पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठ मंडळींसह तरुणांनी लेझीमखेळण्याचा आनंद लुटला याशिवाय उपस्थित सर्व महिलांनी कलश घेऊन मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.त्याचप्रमाणे महिलांनी फुगडी खेळून स्वतःचा व उपस्थित सर्व देवींच्या भकांचा आनंद द्विगुणित केला.तरुणांनी डीजेपुढे ठेका धरला. उदापूर पंचक्रोशीतील शेतकरीह आपल्या सर्जा-राजा बैलजोडीसह मांडव डहाळे मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी अध्यक्ष रोहिदास अमुप,सचिव विनायक अमुप, सल्लागार माधव अमुप, सदस्य संजय अमुप,चंद्रकांत अमुप,प्रवीण अमुप,सुरेशअमुप,सचिन अमुप,समीर अमुप,ज्ञानेश्वर अनुप,चित्राताई अमूप, उदापुर गावच्या विद्यमान उपसरपंच जयश्रीताई अमूप जनाबाई लोखंडे,रूपाली अमुप,रंजना अमुप,शिल्पा अमुप यांच्यासह उदापुर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात्रेचे नियोजन कवठधरी माता यात्रा उत्सव मंडळ,अमुपमळा (रानमळा) उदापूर,पुणेकर व मुंबईकर मंडळींनी केले.