जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी डिसेंट फाउंडेशन पुणे व गिरजा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गोळेगाव,ता:-जुन्नर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.गिरिजा पतसंस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने या आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून इतरही सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संस्था वर्षभर राबवणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राजेश बिडवई यांनी यावेळी सांगितले.
या शिबिरामध्ये ११३ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ३३ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली. तसेच १०१ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली तसेच हृदयरोग व मूत्र रोगाच्या देखील तपासण्या यावेळी करण्यात आल्या. या शिबिरासाठी पंचायत समिती तालुका आरोग्य विभाग, डोके हॉस्पिटल नारायणगाव, श्री हॉस्पिटल आळेफाटा, डेरे सोनोग्राफी सेंटर नारायणगाव, कथे डायनोस्टिक सेंटर नारायणगाव, हिंद लॅब जुन्नर व ग्रामीण रुग्णालय जुन्नर या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी डॉ.वर्षा गुंजाळ व डॉ.अमेय डोके यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.
यावेळी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,सचिव फकीर आतार,गिरजा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्थेचे चेअरमन राजेश बिडवई,उपाध्यक्ष दीपक कोकणे, हॉस्पिटल चे डॉक्टर विकास डुबे, डॉक्टर कैलास लासुरवे,हिंद लॅबचे प्रयोगशाळा तज्ञ मंगेश साळवे, समुपदेशक संदेश थोरात,तपासणी तज्ञ सपना बेलवटे, कथे डायग्नोस्टिक सेंटरचे समन्वयक विष्णू मगर, मॅनेजर संकेत खिलारी, गिरीजा पतसंस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र ताम्हाणे, खजिनदार भारत शेटे, सदाशिव ताम्हाणे, गणेश गाडेकर, जयवंत डोके,समन्वयक योगेश वाघचौरे,परिचारिका,अशा सेविका,ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.