गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ
गोलेगाव: ता, ३ गोलेगाव ता, शिरूर येथील हिंन्दु। मुस्लिमाचे ऐक्याचे प्रतिक असणारे आराध्य दैवत पीरसाहेब दावलमलिक याञेस १ तारखेपासून सुरूवात झाली असून याञेचा अखेरचा दिवस ७ तारखेला होणार आहे, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताहांचे नियोजन करण्यात आले, ता ,१ ह,भ,प मेटे महाराज ता,२ गोरक्षनाथ महाराज खाडे ता, ३ कालीदास महाराज काळे ता, ४ बंकट महाराज ढवळे ता, ५ बंकट महाराज ढवळे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे,
बबन महाजन बाळासाहेब वाखारे दावलमलिक याञा कमिटी संजय लोखंडे संपत ढवळे राजेंद्र भोसले माणिक गायकवाड विठ्ठल रोडे गणीभाई तांबोळी याच्या वतीने भाविकांसाठी भोजन देण्यात आले आहे रविवारी सायंकाळी ६ ते राञी ११ वाजेपर्यत संदल मिरवणूक होणार आहे,
सोमवार ता ६ याञेचा मुख्य दिवस सकाळी ९ वाजता देवाची पुजा अर्चा सुगंधी गुलाब जल उटणे लावणे , रंगीबेरंगी फुलांची चादर अस्तरणे, सायं ६ वाजता छबिना मिरवणूक त्यानंतर राञी ८ वा मनोरंजनासाठी सदाबहार करिश्मा पुणेकर याचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होईल, ता,७ यादिवशी दुपारी २ ते ८ यावेळेत कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे, यावर्षी याञा कमिटीचे अध्यक्ष दिलीप लोखंडे उपाध्यक्ष सचिन वाखारे खजिनदार गणेश महाजन तुषार पडवळ हे होते.