जुन्नर तालुक प्रतिनिधी:-रविंद्र भोर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अंतर्गत घेतल्या गेलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती फेब्रुवारी २०२४ च्या परीक्षेत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खटकाळे ता:- जुन्नर जि:- पुणे या शाळेचा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला.अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक उत्तम भोसले यांनी दिली. शासकीय आश्रमशाळा खटकाळे या शाळेतील इयत्ता पाचवीच्या आठ परीक्षार्थी यांनी ही परीक्षा दिली त्यापैकी आठही परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची नावे व गुण पुढीलप्रमाणे१)अस्मिता गभाले:- २०० गुण,२)वैभव साबळे:- १८८ गुण ,३)प्राची वायळ-१८६गुण, ४)अविनाश घुटे-१८४ गुण५)सार्थक भवारी -१७२। गुण,६)समीक्षा साबळे -१७० गुण ७)प्रतिक्षा साबळे -१६८ गुण ८)ओंकार साबळे -१३६ गुण मिळाले.
शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक योगेश गवारी तसेच ज्ञानेश्वर भालेकर ,श्री सचिन थोरात,श्री प्रवीण गाढवे,संभाजी सुर्यवंशी ,श्रीम जान्हवी धराडे या विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक,अधिक्षक,अधिक्षिका उच्च माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,पंचक्रोशीतील पालक वर्ग यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल कौतुक केले.