जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

डिसेंट फाउंडेशन, पुणे व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून मागील पाच महिन्यात जुन्नर तालुक्यातील एक हजार पेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या असून त्यांना नवी दृष्टी मिळाली आहे.

सोमवार दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे डिसेंट फाउंडेशन पुणे व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या माध्यमातून व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने सावरगाव येथे गेल्या चार महिन्यात हे पाचवे शिबिर असून आजच्या शिबिरात ५० नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली व २१ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले. ऑपरेशन साठी गेलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, नाश्ता, जेवण व एक महिन्याची औषधे मोफत देण्यात येणार आहे. तालुक्यात आत्तापर्यंत सावरगाव, मढ, ओतूर, कुसुर, आळेफाटा, लेण्याद्री, ओझर अशा विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांमधून आतापर्यंत १०६१ लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,सचिव फकीर आतार,संचालक आदिनाथ चव्हाण,वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय जाधवर, शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, सरपंच दीपक बाळसराफ, तंटामुक्ती अध्यक्ष राजन बाळसराफ, सदानंद डोके, परिचारिका,अशा सेविका, तपासणी तज्ञ, ग्रामस्थ व नेत्र रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button