शुभम वाकचौरे
शिरूर तालुक्यातील पुरवठा विभागात गोरगरीब नागरिक अनेक महिन्यांपासून पुरवठा विभागात फेऱ्या मारत आहे. स्वस्त धान्यांपासून फक्त गरीबच वंचित आहे.सर्व तालुक्यातील लोकांना पुरवठा विभागात आपल्या शिधापत्रीकातील नाव कमी करणे, नाव वाढ करणे, नवीन रेशन कार्ड काढणे या साठी शिरूर येथे यावे लागत आहे. परंतु पुरवठा विभागाच्या दारात गेल्यावर त्या ठिकाणी बाहेरील फलक वाचून परतीचा मार्ग दाखवला जात असल्याचा प्रकार निदर्शनात आला आहे. मग पुरवठा विभागातील कर्मचारी कोणते काम दिवसभर करत असतात असा प्रश्न सर्व सामान्य नागरीकांना पडताना दिसून येत आहे.
स्वस्त धान्याचा लाभ घेणारे अनेक धन दांडगे लोक, शिरूर तालुक्यात आहे. सरकारने नियम फक्त गरिबांसाठीच बनवले आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे? रेशनचे धान्य लाटणाऱ्या श्रीमंत व्यक्तींचा सर्वे हा फक्त कागदीच झालेला आहे का? धन दांडग्या व्यक्तीवर कारवाई कधी होईल. आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते’, असा पुरवठा विभागाचा कारभार झाला आहे.
शिरूर तालुक्यातील अनेक नागरिक कामानिमित्त पुरवठा विभागाकडे येत असतात. पण पुरवठा विभागातील कर्मचारी नागरिकांची साधी बाजूही ऐकून घेत नाही.पुरवठा विभागात जाणाऱ्या संबंधित व्यक्तीला त्यांना आपल्या कामाची ऑनलाईन प्रक्रिया करून आणण्यासाठी परत परतीचा मार्ग मात्र दाखवला जात आहे. पुरवठा विभागात लक्ष्मी चे दर्शन झाले की नागरिकांची कामे जोमाने सुरू होतात. पण आता ती ही कामे बंद झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.तर काही एजंट मार्फत पुरवठा विभागात कामे सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
पुरवठा अधिकारी पुरवठा विभागात नसल्यावर नागरिक हे कामासाठी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना पुरवठा अधिकारी यांचा मोबाईल नंबर द्या असे सांगितल्यावर कर्मचारी बोलतात की आमच्या कडे त्यांचा मोबाईल नंबर नाही. मग दूरवरून आल्याल्या लोकांनी काय करायला पाहिजे. पूर्ण दिवस पुरवठा विभागात बसून राहायचे का? का प्रत्येक दिवशी येऊन फेऱ्या मारायच्या का? हा अजब कारभार कधी थांबणार.
पुरवठा अधिकारी यांना फोन केल्यावर तुम्ही कोण आहे? काय काम आहे. आणि काम सांगितल्यावर तुम्हाला कोणी नंबर दिला. अशी धक्कादायक बाब समोर येत आहे. अधिकारी व्यक्तींचा फोन शासकीय कामासाठी आहे का? व्यक्तिगत वापरासाठी आहे. असा प्रश्न मात्र निर्माण होत आहे.
शिरूर तालुक्यातील श्रीमंत धन दांडग्या व्यक्तीची नावे आम्हाला द्या. म्हणजे अशा व्यक्तीवर आम्ही कार्यवाही करू. मी चार्ज घेतल्यापासून नवीन व्यक्तीला कोणत्याही स्वस्त धान्य लाभामध्ये घेतले नाही. धान्य कोठा उपलब्ध झाल्यावर लोकांचा विचार केला जाईल.मी फक्त प्रामुख्याने अंध अपंगांनाच सहकार्य केले आहे.
शिरूर पुरवठा निरीक्षक – सतीश पंचरस.