(“इंटरनॅशनल म्युझियम एक्सपो २०२४” अंतर्गत पश्चिम विभागामध्ये दुसरी.)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे या सीबीएसई मान्यता प्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थिनीचा “इंटरनॅशनल म्युझियम एक्सपो २०२४” अंतर्गत झालेल्या “आयडियाथॉन ऑन सायन्स गॅलरी” या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.

नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम, भारत सरकार सांस्कृतिक विभाग,पिंपरी चिंचवड सायन्स पार्क पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या विभाग पातळीवरील चल विज्ञान प्रतिकृती स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुल मधील प्रिया राजदेव या विद्यार्थिनीने तयार केलेल्या “स्प्रे सिस्टीम फॉर क्रॉप” या प्रकल्पाची पश्चिम विभाग पातळीवर निवड करण्यात आली.पुढील स्पर्धा विभाग पातळीवर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.या स्पर्धेमध्ये पुणे विभागातील इयत्ता नववी ते अकरावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.विभाग स्तरावरून दोन प्रकल्प राज्य पातळीसाठी निवडण्यात येणार आहेत. आधुनिक काळात शेतीमध्ये विविध प्रकारची कामे तंत्रज्ञानाची कास धरून सहजतेने करता येऊ शकतात.गुरुकुल च्या विद्यार्थिनीने तयार केलेल्या या प्रकल्पाद्वारे फवारणी,कोळपणी तसेच विविध कामे कमी मनुष्यबळाच्या साहाय्याने चांगल्या पद्धतीने करता येणे शक्य होणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.

सदर विद्यार्थिनीला विज्ञान शिक्षिका प्रिया कडूसकर,तसेच प्रा.निर्मल कोठारी,प्रा.प्रियांका लोखंडे,राणी बोऱ्हाडे,रामचंद्र मते,स्नेहल ढोले,विकास सोनवणे यांनी विशेष मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,सारिका ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,क्रीडा संचालक एच पी नरसूडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागातील प्राचार्य, विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button