जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील डॉक्टर सहकारी मित्रांचे अनेक वर्षे प्रलंबित असणारे अनेक प्रश्न असून ते सोडवण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे आणि समाजातील रुग्णांना उत्तम व योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी अनेक आरोग्य शिबीर आयोजित करून प्रयत्न करणार असल्याचे जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.गणेश नायकोडी यांनी सांगितले. शनिवार दि:-२७ एप्रिल रोजी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन २०२४-२५ या वर्षाकरिता नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ उदापुर येथील “आमरा”रिसॉर्ट संपन्न झाला यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.गणेश नायकोडी बोलत होते.
यावेळी पदग्रहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून विघ्नहर साखर कारखाना चेअरमन सत्यशिल शेरकर,माजी आमदार शरद सोनवणे,आळेफाटा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मेडिकल डायरेक्टर डॉ.राकेश गांधी उपस्थित होते. याशिवाय डॉ.नायकोडी यांचे असंख्य मित्रमंडळी आणि तालुक्यातील सर्व डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.गणेश नायकोडी यांनी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर केली यामध्ये उपाध्यक्ष:-डॉ.सुशील बागुल,सचिव:-डॉ. योगेश तांबे,खजिनदार:-डॉ. सुनीता वेताळ व समित्यांचा समावेश आहे.या एकवर्षीय या संघटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी याच जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन ट्रस्ट ही फादर बॉडी आहे यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ.अजित वलव्हणकर,उपाध्यक्ष म्हणून डॉ.प्रताप रोहकले,सचिव म्हणून डॉ.शशांक फापाळे,तर खजिनदार म्हणून डॉ.प्रविण चाळक हे काम पहात आहेत.
यावेळी विशेष कार्यक्रम म्हणून प्रसिध्द कवी,गीतकार व व्याख्याते म्हणून प्रसाद कुलकर्णी यांनी मानवाच्या चिंता व ताणतणाव यांच्यापासून मुक्ती देणारा प्रेरणादायी संवाद “जिंदगी ना मिलेगी दोबारा” सादर करून सर्वांना खळखळून हसविले. यावेळी जगविख्यात सर्पदंश तज्ञ डॉ.सदानंद राऊत, डॉ.राकेश गांधी,मावळते अध्यक्ष डॉ.मनोज काचळे, डॉ.अजित वलव्हणकर,डॉ.संजय वेताळ यांनी मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पुरुषोत्तम बोऱ्हाडे व डॉ.सोनल फापाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुशिल बागुल यांनी मानले.तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मावळते अध्यक्ष डॉ मनोज काचळे,डॉ.भरत घोलप,जुन्नर ता.डॉ,असो.संस्थापक अध्यक्ष डॉ.सदानंद राऊत (सर्पदंशतज्ञ)डॉ.संजय वेताळ, स्त्रीरोग तज्ञ डॉ.राहुल तांबे,ओतूर डॉ.असो. अध्यक्ष डॉ.अमोल चौधरी (ट्रस्ट विश्वस्त) डॉ.अवधूत वलव्हणकर यांनी परिश्रम घेतले.