प्रतिनिधी – शकील मानियार
NH548D बीड मुंबई राष्ट्रीय महामार्ग निर्वी जि.प.प्राथ. केंद्र शाळा निर्वी व तात्यासाहेब खंडेराव सोनवणे महाविद्यालय निर्वी येथे स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बनवणे बाबत राजेंद्र कुलथे यांनी केला अर्ज. राष्ट्रीय महामार्ग NH548D बीड मुंबई निर्वी धोकादायक वळण असल्याने अपघात होत असुन या रोड वर आज पर्यंत झालेल्या अपघातात अनेकांनी प्राण गमावला असुन यात एक अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीने प्राण गमावला आहे.
जि.प. शाळा, अंगणवाडी व हायस्कुल असुन शाळेतील मुलांना तसेच दक्षिणमुखी मारुती मंदिर असुन भावीकांना दर्शनासाठी तसेच महाविध्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांना रस्ता ओलंडने साठी फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्या ठिकानी वर नमूद केले प्रमाणे लाल दिवा (सिग्नल लैम्प) बसवणे अत्यंत महत्वाचे आहे तरी आपण वरील ठिकाणी गतिरोधक व सूचना फलक तसेच रेड सिग्नल लॅम्प बसवण्यासाठी सहकार्य करावे यासाठी ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे कॉर्डिनेटर राजेंद्र कुलथे यांनी पाठपुरावा करून संबंधित विभागाला यासंबंधी मागणी केली होती ती मागणी मान्य झाली असून येत्या पंधरा दिवसात स्पीड ब्रेकर चे काम चालू होणार आहे तसेच शिरसगावच्या पुढील हायवेचे राहिलेले काम देखील पूर्ण करणार आहेत