जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

जुन्नर तालुक्यात पिंपळगाव जोगा, माणिकडोह,चिल्हेवाडी,येडगाव,वडज, ही मोठी धरणे असून या धरणांमधून सोलापूर व नगर जिल्ह्यातील तालुक्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र याच तालुक्यात आदिवासी भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो हा विरोधाभास नसून वस्तुस्थिती आहे .

जुन्नरच्या उत्तरेकडील कोपरे,मांडवे, जांभूळशी,मुथाळणे,ही गावे व त्याच्या बारा वस्त्या साधारणपणे लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त तर पेसा कायद्या अंतर्गत दोन ग्रुप ग्रामपंचायती येतात. गावांना मुबलक पाणी मिळावं यासाठी अनेक प्रयत्न केले असल्याचं गावाचे सरपंच रोहिणी माळी.त्या म्हणाल्या “आम्हाला गावात धरण किंवा मोठा तलाव ( एमआय टॅंक) बांधून देण्याची मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतोय.त्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा देखील केला.पण समस्या सुटता सुटत नाही.या अतिदुर्गम आदिवासी भागातील पाण्याचे सर्व स्त्रोत त्यामध्ये झरे,सार्वजनिक विहिरी, शिवकालीन टाक्या, मांडवी नदीचे पात्र देखील या उन्हाळ्यात कोरडे ठाक पडले आहेत.

गावाला दिवसातून किमान ०५ टँकरची फेरी (खेपा)आवश्यकता आहे.पण त्याची पूर्तता होत नाही” असे सरपंच म्हणाल्या.”मतदानाच्या वेळी सगळे आमच्यापर्यंत पोहचतात, पण निवडणुका संपल्या की गावाकडे ढुंकूनही कुणी बघत नाही” सरकारविषयी असलेली अनास्था महिलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दत्तकघेतलेले जांभुळशी गाव देखील गेली पाच वर्षे पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ दूर होईल याच आशेवरचराहिले मात्र माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी टॅंकर द्वारे पाणी पुरवठा केला असल्याचे सर्व आदिवासी बांधवांनी सांगितले. गावात टॅंकर आला की लहान मुलांपासून ते महिला,वृद्धांपर्यंत सर्व आपलं घरातील रिकाम्या भांड्यात पाणी साठविण्यासाठी संघर्ष करावाच लागतो आहे .या व्यतिरिक्त पाळीव जनावरांना आवश्यक पाणी पुरवठा करण्यात इकडे तिकडे रानावनात भटकंती करताना दिसतात.कित्येक वेळा पाणी मिळविण्यासाठी कामाला सुट्टी घ्यावी लागते त्यामुळे रोजंदारी बुडवून प्रपंच कसा करायचा असा यक्ष प्रश्न या आदिवासी महिलांना पडलेला दिसतो. जर यावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर मतदानावर बहिष्कार घातला जाईल असा इशारा या भागातील आदिवासी परिवर्तन समितीने दिला आहे.

१) माझं आयुष्य पाण्याभोवतीच फिरतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या डोक्यात पाण्याचाच विचार असतो,” “माझा दिवसातला जास्तीत जास्त वेळ पाणी आणण्यात जातो. फक्त माझाच नाही, माझ्या गावातल्या इतर बायकांचाही.” (यमुना बांगर महिला काठेवाडी)

२)गावात मुख्य पीकं धान(भाताचा एक प्रकार) पावसाच्या पाण्यावरची कोरडवाहू शेती करत असल्याने गावकरी दसरा-दिवाळीनंतर रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर करतात.बहुतांश बनकर फाट्यावर शेतमजुरी कामावर जातात.कोपरे मांडवे पाणी प्रश्न बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची इच्छा प्रशासनामध्ये दिसत नाही. कारण आदिवासी समाजाकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ नाही.” अस सुनील माळी या सामाजिक कार्यकर्ते यांचं म्हणणं आहे.

३)कोरडे नळ आणि पाइपलाइन कोपरे जांभूळशी ग्रामपंचायतचे सदस्य उमेश माळी यांनी सांगितले की आमच्या घरामध्ये पाण्याचा पुरवठा नाही आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्यात पाईपलाईन टाकल्या जात आहे.जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल हर घर नल चे काम प्रगतीपथावर आहे.नदीतच पाणी नसेल तर नळाला येणार कसे?? फक्त शासनाची योजना आहे ते राबविण्याचा केविलवाना प्रयत्न सध्या तरी प्रशासनाकडून करण्यात येत आहे “आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार”!

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button