शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
पुणे जिल्ह्यात सामाजिक व पञकारीता क्षेञात प्रामाणिकपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते पञकार शेख शौकत मुजावर यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सारभाई शेख यांनी त्यांच्या प्रामाणिक व उल्लेखनीय कार्याची दखल घेवुन त्यांना पुणे जिल्हाअध्यक्षपदाचे नियुक्ती पञ देऊन महत्वपुर्ण जबाबदारी देत निवड केली.
पत्रकार शेख शौकत मुजावर हे मंत्रालय,विधानभवन येथील वृत्तसंकल करून विविध दैनिकांमध्ये प्रसिद्ध करून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. समाजातील विविध विषयानंवर तसेच पत्रकाराच्या ज्वलंत प्रश्नावर बातम्यांच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असून एक अनुभवी पत्रकार व महाराष्ट्रात मोठा जनसंपर्क अशी त्यांची ओळख आहे
द युवा ग्रामीण पञकार संघाच्या माध्यामातुन आपण पुणे जिल्ह्यात पञकारांची एकजुठ करून त्यांना संघटित करून विविध योजना,न्याय हक्कासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे निवडी दरम्यान त्यांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असंघटीत पञकारांना द युवा ग्रामीण संघामध्ये सामील करून पञकारांच्या न्याय हक्कासाठी पञकार शेख शौकत मुजावर काम करणार आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल द युवा ग्रामीण पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सारभाई शेख, कार्याध्यक्ष श्याम कांबळे, सचिव हेमंत साठे, सहसचिव विवेकानंद फंड,इलेक्ट्रॉनिक मिडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रोहित वाळके, शिरूर तालुका अध्यक्ष शकील मणियार,विश्वनाथ घोडके, सुजित मैड,मच्छिंद्र काळे,विजय कांबळे,संजय मोरे,सुदर्शन दरेकर,संतोष काळे,सुनिल काटे,ॲड.इन्नुस मणियार, प्रकाश पवार पत्रकार बांधवांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.