दोषी ठेकेदारावर कारवाई करणार- प्रशांत कडूसकर मुख्य कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नारायणगाव.
जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
शिरोली बुद्रुक येथील शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या केटी बंधाऱ्याचे काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या मागणीनुसार या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्यामुळे ते पाणी बंद व्हावे यासाठी नारायणगाव पाटबंधारे विभाग यांनी 32 लाख रुपये एवढा खर्च या ठिकाणी केला.
ऐन उन्हाळ्यातच हा बंधारा निकृष्ट झालेल्या कामामुळे यातून बेसुमार त्याचप्रमाणे प्रचंड पाणी वाहून गेल्यामुळे शिरोली बुद्रुक तेजेवाडी शिरोली खुर्द येथील शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा तोटा उन्हाळ्यात सहन करावा लागणार आहे.
या केटीचे दुरुस्तीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याच्या बातम्या वारंवार अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाच्या कामाला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई व्हावी अन्यथा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत हे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने त्याचप्रमाणे शिरोली बुद्रुक ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला कळविले होते.
वरील सर्व बाबींची दखल घेत त्याचप्रमाणे विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नारायणगाव पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी स्वतः बंधाऱ्याची येऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता गावातील पोलीस पाटील अमोल थोरवे राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब विधाटे विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांचे पीए संतोष राऊत त्याचप्रमाणे सचिन थोरवे अध्यक्ष तालुका युवा शेतकरी संघटना यांनी अनेक प्रश्न त्या ठिकाणी नारायणगाव पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे मुख्य कार्यकारी अभियंता कडूसकर यांना उपस्थित केले .
सद्यस्थितीत त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करून तीन ते चार दिवसांमध्ये हा बंधारा परत पाण्याने भरून देण्याचे त्याचप्रमाणे दुरुस्ती अहवाल सर्वांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर वरिष्ठांकडे सादर करणार असून निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थ बाळासाहेब विधाटे, अमोल थोरवे, संतोष राऊत, सचिन थोरवे ,संदीप शिंदे यांना दिले आहे यावेळी पाटबंधारे विभागाचे उप अभियंता आर जी हांडे वैष्णव साहेब उपस्थित होते.