जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पिंपळवंडी ता:-जुन्नर येथे शेतात ऊसतोडणी सुरू असताना एका १८ वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला केला.त्यात ती जखमी झाली.ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की, पिंपळवाडी येथील तोतरबेट मळ्यात रहात असलेले सूर्यकांत सखारामतोतरे यांच्या शेतात मंगळवारी ऊस तोडणी चालूहोती. त्यावेळी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ऊसतोडणी कामगारांसोबत असलेल्या रितू श्यामराव गागुर्डे वय वर्षे १८ मुळ रा:-चाळीसगाव या मुलीवर बिबट्याने अचानकपणे हल्ला केला.त्यावेळी बाजूला असलेल्या ऊसतोडणी कामगारांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला.
दरम्यान,यावेळी बिबट्याच्या पंजाच्या नख्यांनी रितु गांगुर्डे हिच्या डोक्यावर, खांद्यावर व पाठीवर जखमा झाल्या.यानंतर तातडीने रितु हिस उपचारा साठी पिंपरीपेंढार येथील सरकारी दवाखान्यात नेत वनविभागास ऊसतोड मजुरांनी माहिती दिली.वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी तातडीने घटनास्थळी आळे वनपरिक्षेत्रेचे वनपाल संतोष साळुंखे वनसेवक बी. के. खर्गे, रोशन नवले यांना तातडीने घटनास्थळी पाठवले. या ठिकाणची ऊस तोडणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे.