जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथे पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी इव्होल्वोस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे मार्फत कॅम्पस रिक्रुटमेंट कार्यक्रम आयोजित केला होता अशी माहिती रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रमेश शिरसाट यांनी दिली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इव्होल्वोस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड,पुणे मधील प्रतिनिधी स्नेहल मोरे (एच.आर.) व अर्चना हजारे (रसायनशास्त्र विभाग ) उपस्थित होत्या.
इव्होल्वोस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड,पुणे मधील प्रतिनिधी स्नेहल मोरे व अर्चना हजारे यांनी विद्यार्थ्यांची रिटर्न टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांना कंपनी प्रेझेंटेशन दाखविले तसेच कंपनीमधील असणाऱ्या कामाची माहिती विद्यार्थ्यांना दिली व विद्यार्थ्यांच्या मनामधील असणाऱ्या शंकांचे समाधान करून त्यांच्यामधील उत्साह वाढविला. सदर रिक्रुटमेंट साठी आळे,जुन्नर,नारायणगाव,ओतूर महाविद्यालयातील पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील ४० मुले सहभागी झाली होती.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी डॉ.जयसिंग गाडेकर,प्रा.समीर शेख,प्रा.संतोष काळे, आय.क्यू.ए.सी.कॉर्डिनेटर डॉ.योगेश्वर काळदंते, प्रा.रोहिदास मेमाणे, प्रा.स्वप्नाली दांगट,प्रा.रत्नमाला मोरे व शिक्षकेतर कर्मचारी निखिल काकडे,अमोल बारगळ,किरण ढोमसे व श्रीमती शेख टी.न.यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. रमेश शिरसाट व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुवर्णा डुंबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ.एकनाथ कबाडी यांनी केले.