जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

डुंबरवाडी ता:- जुन्नर येथील कल्याण नगर महामार्गावरील एका हॉटेलजवळ रविवार दि:-१४ एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ३ वाहनांचा अपघात झाला.यात टेंपोचालक जखमी झाला असून तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती मिळाली की, आळेफाट्याच्या दिशेकडून ओतूरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ एमएच १४ इवाय ८४२६ ला ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या कार एमएच १४ बीएक्स ८००८ ची धडक झाली.त्यानंतर कार टेंपो एमएच १४ डीएम ९००८ ला धडकला.यात टेंपो– चालक सुरेश तुकाराम शिंदे रा:- आळे, ता:-जुन्नर हे जखमी झाले. त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या तिहेरी अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघाताचे कारण समजू शकले नाही.

अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर,पोलीस हवालदार विलास कोंढावळे हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button