निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
पंचशील वैद्यकीय कक्ष अहमदनगर व नवजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने शरदवाडी येथे आज आरोग्य शिबिर घेण्यात आले त्यामध्ये डोळे तपासणी ,बीपी, शुगर ,मणक्याचे आजार, सर्दी, खोकला, ताप ,पोटाचे विकार ,गुडघेदुखी ,कंबरदुखी सांधेदुखी, अशा आजारावरती तपासण्या करण्यात आल्या व गरजूंना गोळ्या व चष्म्याचे वाटप करण्यात आले.
सरदवाडी ग्रामपंचायतिची नव्याने सुरुवात झाली असून तेथील ग्रामस्थांनी या शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. व या आरोग्य शिबिराचा ग्रामस्थांनी पुरेपूर फायदा घेतला. यामध्ये प्रामुख्याने 157 जणांच्या आरोग्याच्या तपासण्या या मोफत करण्यात आल्या. यावेळी नवजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ सुमनताई सखाराम साळवे उपाध्यक्ष सुरेश समीना पठाण खजिनदार आशा ज्ञानदेव वाळके सरदवाडी ग्रामपंचायत सरपंच हरिभाऊ गंगाराम सरोदे उपसरपंच सौ छाया सरोदे, ग्रामपंचायत सदस्य अशोक गांजे पुष्पा गांजे बाबुराव कोमल आवटी मंदाबाई गांजे जयश्री सरोदे चैतन्य गांजे सौ कविता सरोदे कैलास सरोदे व डॉक्टर ऋषिकेश कवडे डॉक्टर निखिल दिवेकर डॉक्टर राहुल ठोंबरे किशोर कवडे व सर्व जांबुत शरदवाडी गावचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
या पूर्वी या गावात कुठल्याही पद्धतीचे असे आरोग्य विषयक शिबीर घेतले गेलेले नाही हि बाब सौ . सुमनताई साळवे यांच्या लक्षात आल्यावर हे शिबीर त्यांनी आयोजित करून ग्रामस्थ आबाल वृद्ध माताभगिनी यांना या शिबीराचा लाभ देऊ केला विशेष म्हणजे सर्व मेडिसीन ( औषधे ) हि विनामूल्य देण्यात आली असून नंबरचे चश्मे कि ज्याची किमंत बाहेर १००० ते १२०० रु किंमत असणारे शिबीरात फक्त २०० रुपायात देण्यात आले याप्रसंगी उरळगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री भाऊसाहेब बाजीराव कोकडे आणि आप्पासाहेब दादाभाऊ सात्रस उपस्थित होते .