निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
रांजणगाव एमआयडीसी येथे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी इकोरिया कंपनीने फाउंडेशन ची स्थापना केली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी इकोरिया कंपनीचे अध्यक्ष टी वाय जिओंग यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की एमआयडीसीच्या वातावरणाची योग्य काळजी घेतल्यास रांजणगाव एमआयडीसी एक स्वच्छ सुंदर व सर्वोत्तम औद्योगिक पार्क तयार होईल. तसेच एमआयडीसीतील रस्ते स्वच्छ करणे, परिसरातील आवश्यक तिथे स्वच्छता ग्रह,बैठक व्यवस्था, सौरऊर्जावरील पथदिवे बसविणे, त्यांची देखभाल करून एमआयडीसी रस्ते व परिसर स्वच्छ व सुंदर बनविणे हा इकोरिया फाउंडेशनचा उद्देश असून कंपनीच्या वतीने स्वच्छतेसाठी ट्रॅक्टर व ट्रॉली फाउंडेशनकडे हस्तांतरित करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी स्वच्छतादूत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एच जी चॉय ,जसाविंदर सिंग, व्यवस्थापक जगदाळे असेम्ब्ली हेड विनय सिंग, मार्केटिंग हेड केतन भामरे, एच.आर. राहुल बोरा, सोहम टेली लिंकचे दादाभाऊ चिखले, संचालक गायत्री चिखले, मोहन चिखले,कनिष्ठ अभियंता भूषण ठाणगे, पोलीस उपनिरीक्षक सुहाष रोकडे, जिल्हा पंचायत सदस्य असोसिएशनचे अध्यक्ष कैलास गोरे, कर्डीलवाडीचे सरपंच राजेंद्र दसगुडे, सोहम टेलिंकचे रवींद्र जाधव, बिझनेस डेव्हलपमेंट डायरेक्टर अजय कडूकर, ऑपरेशन हेड एच आर डायरेक्टर राजेंद्र मोरे, येरिआ मॅनेजर प्रवीण पऱ्हाड आदी मान्यवर उपस्थित होते फायनन्स मॅनेजर राहुल बोरा यांनी सूत्रसंचालन केले व परचेश हेड चेतन भामरे यांनी आभार मानले.