जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर

पत्रकार हासुध्दा एक समाजसेवक आहे.तो समाज मनाचा आरसा असून,आज पत्रकारांवरचहल्ले होताना दिसत आहेत.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर असे हल्ले होत असतील तर हा देश हे राज्य सुरक्षित कसे राहणार असा सवाल अण्णा हजारे यांनी केला. लोकशाहीचा चौथा स्तंभ जर सुरक्षित असेल तरच लोकशाही सुरक्षित राहील.पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने विधीमंडळ तसेच संसदेत कठोर कायदे संमत करुण घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.राळेगण सिद्धी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर यांचे वतीने समाजातील विविध गुणवंतांचा सन्मान, पत्रकारांना रेनकोटवाटप व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे बोलत होते.

यावेळी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे तसेच राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव डाॅ.विश्वासराव आरोटे यांचे अध्यक्षतेखाली सर्व पत्रकार बांधवांना रेनकोट तसेच ओळखपत्र व एक वृक्षभेट देण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन,राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते, राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव व शिवसंवाद न्युजचे संपादक गाडगे उपस्थित होते.यावेळी पद्मभूषण अण्णा हजारे,डाॅ.विश्वासराव आरोटे,दत्ता पाचपुते व दत्ता गाडगे आदी मान्यवरांचे उपस्थितीमधे प्राथमिक शिक्षक आनंदा झरेकर, तुकाराम आडसुळ,पीएसआय ( केंद्रिय पोलीस दल) तुषार ढवण,लोकशाहीर दत्ता करंदीकर,नुतन चौधरी मुंबई पोलीस,लोककलावंत मनिषा चव्हाण आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह तसेच शाल,श्रीफळ,बुके देउन सन्मानित करण्यात आले.

यावेळी म्हणाले राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंढे,मुख्य संघटक संजय भोकरे, सचिव डाॅ. विश्वासराव आरोटे,यांनी राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटीत करत अनेक सामाजिक उपक्रम राबवून पत्रकारांना न्याय देण्याचे पवित्र कार्य केले.झोपलेल्या सरकारला नेहमी जागे राहण्यास भाग पाडले.पत्रकारीता करत असताना नियमीत सेवाभाव जपण्याचे काम केले आहे.राज्यातील ग्रामिण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पत्रकारांवर हल्ले होत आहे झोपलेल्या सरकारला हे कधी कळणार लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आल्यामुळे लोकशाहीवरच हा हल्ला असुन, सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पहायला हवे. यासाठी राज्य व केंद्र सरकारने विधीमंडळ आणी संसदेत पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी कठोर कायद्याची निर्मीती करावी अशी मागणी अण्णा हजारे यांनी सरकारला केली. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव डाॅ.विश्वासराव आरोटे म्हणाले,अण्णांनी माहीतीचा अधिकार हि देशाला दिलेली देणगी आहे. पत्रकारांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे.अण्णांनी समाजाला न्याय देण्यासाठी अनेक यशस्वी आंदोलने केली.अण्णा हे देशाचे प्रति गांधीजी आहेत.पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी सरकारने कठोर कायदे करावेत अशी सुचना केंद्र व राज्य सरकारला देण्याची गरज असल्याची मागणी आरोटे यांनी केली. पत्रकार बांधवांना रेनकोट वाटप करताच वरुण राजाचे आगमण झाल्याने सर्वच आनंदी झाले.पत्रकार बांधवां साठी जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी प्रथमच मोठा वेळ दिला.

याप्रसंगी राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष विनोद गायकवाड.श्रीगोंदा तालुका तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे,सचिव पिटर रणसिंग,पारनेर तालुका उपाध्यक्ष सुरेश खोसेपाटील,रामदास नरड,अविनाश भांबरे,खजिनदार संतोष कोरडे,पारनेर शहराध्यक्ष संतोष तांबे,निघोज शहराध्यक्ष सागर आतकर,मायभूमीचे कार्यकारी संपादक महेश शिंगोटे,पत्रकार वसंत रांधवन, संपत कपाळे, गंगा धावडे, आनंदा भुकन,संपत वैरागर, संदीप गाडे,अनिल चौधरी,भगवान मंदिलकर,नितीन परंडवाल,सचिन जाधव आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी संघटनेच्या कार्याचा धावता आढावा घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष संजय मोरे यांनी तर,आभार सचिव बाबाजी वाघमारे यांनी आभार मानले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button