जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर

बॉर्डरलेस पँथर्सचा उद्या रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी जुन्नरच्या पश्चिमेकडील सोमतवाडी रस्त्यावर असणाऱ्या शिवनेरी फोर्ट व्हॅली रिसॉर्ट येथे स्नेहमेळावा होणार आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

जुन्नर तालुक्यातील पिंपळगावजोगा येथील मूळ रहिवाशी असणारे व सध्या ऑस्ट्रेलियास्थित असणारे दिपक सुकाळे आणि देविदास तांबे,शिरीष भोर, रवि एरंडे डॉ.सीमा पानसरे शिंदे,जालिंदर उकिर्डे,पोपट नलावडे यांनी एकत्रित येवून बॉर्डरलेस पॅथर्स नावाचा व्हॉटसअप ग्रुप तयार केला.या ग्रुपमध्ये अगदी सर्व- सामान्य नागरिकापासून कृषी,क्रीडा,सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक,मिडिया,वैद्यकीय,प्रशासकीय सेवा,व्यापारआणि पत्रकार आदी क्षेत्रातील मान्यवरांना सामावून घेतले.प्रत्येकाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

मात्र या ग्रुपवर गुड मॉर्निंग,गुड नाईट, वाढदिवसाच्या शुभेच्छा,भावपूर्ण श्रद्धांजली यासारख्या कॉमन गोष्टीना अजिबातच थारा दिला जात नाही मात्र ग्रुपमधील एखाद्या व्यक्तीचावाढदिवस असेल तर त्याच्याबद्दल साहित्य स्वरुपात लिखाण केले जाते.असे सांगून ऑस्ट्रेलिया येथून बोलताना दिपक सुकाळे म्हणाले,बॉर्डरलेस पँथर्सचा उद्या होणारा हा तिसरा स्नेहमेळावा असून उद्या सकाळी साडेसहा वाजता जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सर्वानी एकत्र यायचे असून त्यानंतर किल्ले शिवनेरी येथे सर्वजण जाणार आहेत.तेथे शिवनेरी दर्शन व दुर्ग वाचन याचे विनायक खोत व डॉ अमोल पुंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. ज्यांना किल्ले शिवनेरीवर येणे शक्य होणार नाही त्यांनी सकाळी दहा वाजता शिवनेरी फोर्ट व्हॅली रिसॉर्ट येथे यायचे आहे.

स्नेहमेळाव्याचे सकाळी अकरा वाजता पहिले सत्र सुरु होणार असून राज्यगीत,दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन बॉर्डरलेस वंदना,प्रतिज्ञा मायभाषेची, काव्यवाचन,समूहातील सर्व जावयांचे स्वागत,शिव- छत्रपती फ्युजन,भूमिपूजन समारंभ होणार असून दूरदर्शनच्या आपली माती आपली माणसंचे सेवा- निवृत्त दिग्दर्शक अशोकराव डुंबरे यांच्या हस्ते ओतूर येथील डॉ प्रविण डुंबरे यांच्या मोरपंख या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.दुपारच्या सत्रात ह.भ.प. सदाकाळनाना व ह.भ.प. भरत काशिद यांचे सुश्राव्य भजन होणार असून निवडक कवींचे कवी संमेलन होणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button