जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ नंदकिशोर उगले यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती प्राचार्य डॉ महेंद्र अवघडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे यांनी दिली. सदर कार्यक्रमांमध्ये आपल्या व्याख्यानामध्ये डॉ.उगले यांनी आपल्या मनोगतात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत असतानाच महात्मा ज्योतिबा फुले हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श होते असे नमूद केले.
तसेच या दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्य नुसार जोपर्यंत जातीव्यवस्था संपुष्टात येत नाही तोपर्यंत सामाजिक ऐक्य निर्माण होणार नाही असे मत व्यक्त केले, त्यासाठी सर्वांनीच स्वातंत्र, समता, बंधुता व न्याय या चतुसूत्री चा अवलंब केला पाहिजे.याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सर्वच महापुरुषांच्या जीवनावरील आधारित साहित्याचे वाचन करून आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका सायली अहिनवे विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर एन शिरसाट, डॉ के डी सोनावणे, डॉ एस एस लंगडे, प्रा. जे ऐ शेटे आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ निलेश काळे, डॉ दत्तात्रय टिळेकर व डॉ रमाकांत कसपटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अमोल बिबे यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मनोज गायकर याने तर आभार प्रदर्शन डॉ.अनिल लोंढे यांनी व्यक्त केले.