जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

सद्यस्थितीत ग्रामीण भागात गावोगाव यात्रा जत्राचा हंगाम सुरू आहे.ग्रामदैवत देवी देवतांच्या जत्रा-यात्रेच्या परंपरेनुसार धार्मिक विधी सोबत मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे म्हणजेच लोकनाट्याचे देखील आयोजन केलेले असते.सोबत यावर्षी लोकसभेच्यानिवडणुकाही असल्यामुळे नेते,पुढारी आणि खासकरून कार्यकर्ते हे यात्रा- जत्राना भेट देऊन प्रचार यंत्रणा राबवित आहेत या सर्व धामधुमीत अनेक गावांत आज तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न आ वासून उभा आहे.तर आदिवासी भागातील अनेक गावे आजही लोकप्रतिनिधीनी दिलेल्या फसव्या आश्वासनउराशी बाळगून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत.

बहुतांश गावांमधून पशु,पक्षी,जनाबर तहानलेली असून गावकऱ्यांना देखील पिण्याचे व रोजच्या वापरासाठी लागणारे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.आदिवासी पट्ट्यातील महिलाभगिनी हजारो फूट कडे दरड उतरून एक हंडा पाणी जमवून व डोईवर घेऊन पुन्हा तितकीच कडे दरडी चढून माघारी येताना आणि शेतीक्षेत्र, डोंगर, दऱ्या उघडी बोडकी झालेली पहाताना मनाला वेदना झाल्या शिवाय रहात नाहीत. ग्रामीण भागात ओढे,नाले,नद्या, विहिरी,तलाव,कूपनलिकाकोरड्या ठाक पडल्याचे चित्र पुणे जिल्ह्यातील काही गावांत आणि खासकरून आदिवासी भागात दिसून येत आहे तर धरण क्षेत्रांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. ही आजची पाण्याची भीषणता पहा गावोगावच्या यात्रेतील तमाशात गाणी व निवडणुकीची फिरणाऱ्या गाडीवर भोंग्यातून वाजत असलेली गाणी तितकेसे समाधान देत नाहीत. असा काहीसा अनुभव आज येऊ लागला आहे. त्यात शेतमालाचे पडलेले बाजारभाव, पिकांचे कमी गळीत अन् बिबट्यांची दहशत शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेली दिसते परिणामी मतदारांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे. शिरूर लोकसभेची निवडणूक देखील भीषण पाणी टंचाईवर गाजणार असून ज्या भागात नागरिक पाण्यासाठी टाहो फोडीत आहेत. त्या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी मतदार राजा उभा रहाणार हे अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उत्तर पुणे जिल्ह्यातकोपरे,मांडवे,मुथाळणे,पुताचीवाडी जांभुळशी,आणे, पिंपरीपेंढार,खामुंडी,डुंबरवाडी गायमुखवाडी आदी गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.उपरोक्त काही गावांना पिंपळगाव जोगा व चिल्हेवाडी धरण कालव्यापासून टाळण्यात आल्याने तेथे दुष्काळाला जाणीवपूर्वक आमंत्रण दिल्यासारखेच आहे.केवळ गाणी वाजवून पाणी मिळणार का?असा खडा सवाल शेतकरी करू लागले आहेत. अद्याप पाऊस सुरू व्हायला दोन महिने बाकी आहेत.पिण्याचे पाणी कोण व कसे देणार याचे उत्तर मतदार राजाला अपेक्षित आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button