जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्याच्या माळशेज पट्ट्यातील पुष्पावती व मांडवी नदीच्या खोऱ्यात व सभोवताली परिसरात उन्हाळी हंगामातील बाजरीचे पीक जोमात आले असल्याने शेतकरी वर्ग समाधानी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.याशिवाय जुन्नर तालुक्यातील अनेक भागात बाजरीचे पीक मोठ्या जोमदार वाढत असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळी हंगामातील बाजरीचे पीक हे पशुधनास चारा रूपाने वैरण आणि अन्नधान्य दोन्हीही मुबलक होत असल्याने बहुसंख्य शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक घेताना दिसतात सोबतीला उन्हाळी भुईमूग शेंगांचे पीक देखील लागवड केली जात आहे. बाजरीच्या व भुईमूग पिकास हवामान पोषक ठरू लागले आहे त्यामुळे बाजरीचे पीक हिरवेगार होऊन जोमात येत आहे.
उत्पन्नही चांगल्याप्रकारे मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्ग पिकाची राखण करण्यास व्यस्त आहेत.
या माळशेज भागात पाण्याची कमतरता कधीच भासत नाही मात्र वरून रखरखीत उन्हाचा मारा ठरलेला असतोच परंतु पाण्याची मुबलकता असल्याने या खाद्य पिकांच्या बरोबरीने हिरव्या पालेभाज्या तसेच तरकारी टोमॅटो,कोबी,फ्लॉवर,गवार भेंडी या आर्थिक उत्पादन वाढविणारी पिके घेतली जातात सोबतच शेतीला जोडधंदा म्हणून गाई,म्हशी व शेळी पालन करून दुग्धव्यवसाय केला जातो त्यासाठी हिरवा चारा फारच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
अशा वेळी बाजरीचे पीक उपयोगी ठरते.एकंदरीत सध्या तरी कांदा पिकापेक्षा बाजरी बरी असे शेतकऱ्यांचे मत झाले आहे.