प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कायम कटिबद्ध राहणार असून बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षक स्वतःहून प्रशिक्षित होण्यासाठी प्रेरणा देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य टीडीएफचे राज्य कार्याध्यक्ष जी. के.थोरात यांनी “बदलत्या शिक्षण प्रक्रियेतील शिक्षक संघटनांची भूमिका व आव्हाने” या विषयावर बोलताना केले.
थोरात पुढे म्हणाले की आधुनिक काळात शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल होत असून इंटरनेटच्या माध्यमातून जग एक खेडं बनलेले आहे.वेगवेगळे विचारप्रवाह शिक्षणात येत आहे त्याचा आपण सर्वांनी स्वीकार करून उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे शिक्षक लोकशाही आघाडीच्या तसेच माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून आज तीन सलग व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
टीडीएफचे राज्य विश्वस्त के. एस. ढोमसे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की शिक्षक संघटनांमध्ये अलीकडच्या काळात एकजुटीचा अभाव दिसतो त्यामुळे शिक्षकांच्या समस्या प्रभावीपणे मांडता येत नाही त्यासाठी एकजूट महत्वाची आहे. राज्यसमुपदेशक विजय कचरे यांनी कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयाचे नवीन शैक्षणिक धोरणात असलेले महत्त्व आपल्या ओघवती भाषेतून मांडले.कार्यक्रमाला पुणे विभाग टीडीएफचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे,पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेश खोत,पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सचिन दुर्गाडे,प्रा.जितेंद्रकुमार थिटे,पुणे विभाग टीडीएफचे सचिव मुरलीधर मांजरे,पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते संतोष थोरात,पुणे विभाग टीडीएफचे प्रवक्ते शशिकांत शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर शिक्षिका अध्यक्ष भारती राऊत,सूत्रसंचालन शहर अध्यक्ष संतोष थोरात यांनी तर आभार धोंडीबा तरटे यांनी मानले