जुन्नर प्रतिनिधी :सचिन थोरवे
शिरोली खुर्द या ठिकाणी मेंढपाळ संजय कोळेकर हे त्यांची मेंढर घेऊन शेतकरी संपत मोरे यांच्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी वास्तव्यास असताना त्यांच्या वाड्यावर बिबट्याने दीड वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला केला त्यामध्ये त्या मुलीला आपला जीव गमवायला लागला याची दखल घेत वनविभागाने त्या ठिकाणी लगेचच शेजारी असलेल्या उसाच्या ठिकाणी हजार फुटाच्या अंतराने तीन पिंजरे लावले होते त्यामधील एका पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेर बंद केला असून त्याला माणिक डोह येथील बिबट्या निवारण केंद्रामध्ये ठेवण्यात आल्याचे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले . घटनास्थळी जुन्नर चे डी वाय एस पी रवींद्र चौधर यांनी देखील भेट देऊन मेंढपाळांनी आपला जीव वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी लाईटचा वापर करावा असे सुचित केले .
अनेक राजकीय नेत्यांनी मेंढपाळ संजय कोळेकर आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन आधार देण्याचे काम केले विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्यांचा बंदोबस्त आपण कधी करणार हा प्रश्न उपस्थित करून धारेवर धरले.
जुन्नर तालुका युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी देखील बिबट्या चालल्यात मृत्युमुखी पडलेल्या संस्कृतीच्या आई-वडिलांची भेट घेऊन सांत्वन करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर मदत कशी म्हणून देता येईल यासाठी प्रयत्न केले आणि काल सायंकाळी साडेपाच वाजता जुन्नर उपवन संरक्षक अमोल सातपुते सहाय्यक वन संरक्षक भिसे त्याचप्रमाणे प्रदीप चव्हाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी संस्कृतीचे वडील संजय कोळेकर वन विभागाच्या वतीने अति अति तातडीची मदत म्हणून कुटुंबाला दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते त्यामध्ये मोरे सर विकास मोरे वनविभागाच्या होले मॅडम मृत संस्कृतीचे अनेक नातेवाईक त्याचप्रमाणे तिची आजी या ठिकाणी उपस्थित होते.
अजूनही ते ठिकाणी चार पिंजरे बसवले असून नाईट विजन ड्रोन कॅमेरा द्वारे शूटिंग करून या ठिकाणी बिबटे आहेत का याची खातर जमा वन विभागाचे अधिकारी करत असून या पुढील काळात मेंढपाळांनी जास्त उंचीची जाळी मेंढ्यांसाठी आणि स्वतःला राहण्यासाठी वापरावी त्याचप्रमाणे सौर दिव्यांचा वापर करावा शक्य होईल त्या ठिकाणी रात्रीचे वेळी लाईट लावावी आणि लहान मुलांना सुरक्षितता म्हणून जाळीचे टेन्ट वापरावे असे उपाय भविष्यात राबवल्यास आपला जीव त्याठिकाणी वाचू शकतो अशी विनंती वन विभागाच्या वतीने अमोल सातपुते यांनी मेंढपाळांना विनंती केली आहे. यावर उपाय म्हणून मेंढपाळांनी उपवन संरक्षक अधिकारी अमोल सातपुते यांना आम्हाला रात्रीच्या वेळी आवाजासाठी बंदूक द्या त्याचप्रमाणे संरक्षण दिवे पण आपले माध्यमातून उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी वन अधिकाऱ्यांकडे केली असून त्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
25 लाख रुपये इतकी मदत वनविभागाच्या वतीने मृत संस्कृतीच्या कुटुंबाला मिळणार होती त्यातील दहा लाख रुपये किमतीचा धनादेश संजय कोळेकर यांना दिला असून उर्वरित पंधरा लाख रुपये हे एफडी स्वरूपात लवकरच त्यांना मिळेल असे सहाय्यक उपवनसंरक्षक भिसे यांनी सांगितले आहे.
उर्वरित रक्कम वेळेत न मिळाल्यास आले तालुक्यातील बिबट्यांची संख्या कमी करण्यात वन विभागाला आत्तापर्यंत तरी यश आलेले नाही यापुढे असेच हल्ले चालू राहिल्यास मानवावरील हल्ले कमी होण्यासाठी आणि वनविभागाने यावर ठोस उपाय करण्यासाठी यापुढे काळात शेतकरी संघटनेच्या वतीने जुन्नर येथील वन विभागाच्या कार्यालय वरती एक दिवस पूर्ण तालुका बंद करून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे तालुकाध्यक्ष संजय भुजबळ उपाध्यक्ष अजित दादा वाघ उपाध्यक्ष अजित नाना वालझडे त्याचप्रमाणे युवा अध्यक्ष सचिन थोरवे उपाध्यक्ष मनोज शिंदे यांनी दिला आहे.