जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

हरीश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरून मुंबईतील एका तरुणीने उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. २२ वर्षाची ही तरुणी मुंबईतील घाटकोपर येथे राहणारी आहे. मृत तरुणीच नाव आवनी मावजी भानुशाली असल्याच तपासात समोर आले.दोन दिवसांपूर्वी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास येऊन कोकणकडावर ही घटना घडली.

मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांना खबर देण्यात आली. या मुलीचा मृतदेह रेस्क्यू ऑपरेशन मध्ये बाहेर काढण्यात आला आहे.तरुणीने आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट देखील लिहिल्याची माहिती समोर आली आहे. आई – बाबा मला माफ करा,अशा आशयाची नोट तरुणीने लिहिली आहे.हरीश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून सुमारे १४०० फुट खाली असलेल्या कोकणकड्यावर उभं राहील तरी अंगावर काटा येतो.मात्र,तरुणीने याच कोकणकड्या- वरून स्वतःला मृत्युच्या दारी झोकून दिले.

आई – बाबा मला माफ करा,मला कोणीही मदत करू शकल नाही.मला शब्दात सांगण अवघड झालय.मला तुम्हाला खूप काही सांगायचंय पण मी ते सांगू शकत नाही.मी प्रार्थना करते की कोणावरही अशी वेळ येऊ नये आणि कोणीही असं पाऊल उचलू नये,अशा शब्दात तरुणीने अखेरच्या भावना व्यक्त केल्या आहेत.आवनी ही तरुणी पाचनई गावातून हरीश्चंद्र गडावर निघाली.दुपारच्या कडक उन्हात तरुणी गडावर पोहोचली.त्यानंतर तिने थेट कोकणकड्याची वाट धरली.अडीचच्या सुमारास तरुणी कोकण कड्यावर पोहोचली.ऊन असल्यावर कोकणकड्यावर गर्दी कमी होती.

मात्र,काही वाटेकरी कोकणकड्याजवळ उपस्थित होते. त्यांनी तरुणीला जाताना पाहिलं. मात्र, तिने मनात चाललेल्या शंकानिशांकाचा कोणालाही पत्ता लागला नाही.तरुणीने आपली बॅग खाली ठेऊन कोकणकड्याच्या उजव्या बाजूकडे जात खाली उडी मारली अन आयुष्य संपवलं.पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button