जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

हिरडा नुकसानभरपाई विषयक शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे केलेली आहे.राज्यात, जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या, निसर्ग चक्रीवादळामुळे शेतीपिकांचे,फळबागांचे तसेच घरे व इतर घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झालेले होते. विशेषत: पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव या तालुक्यातील शेतकरी बांधवाना याचा मोठा फटका बसलेला होता. याबरोबरच या तालुक्यातील आदिवासी समाजाचे मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळाचे ही यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

सदरील नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.व नुकसान भरपाई विषयी अहवाल या अगोदर सादर ही करण्यात आला होता. ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून किसान सभेच्या वतीने ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२४ असा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. नुकतेच दि.१५ फेब्रुवारी २०२४ ते २१ फेब्रुवारी २०२४ असे सात दिवसांचे बेमुदत उपोषण प्रांत कार्यालय, मंचर येथील कार्यालयासमोर झाले होते.या उपोषणाची व गावापातळीवर सुरु झालेल्या आंदोलनाची दखल घेत, दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात दि.३ जुन्र २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या, हिरडा शेतीमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत निर्णय झाला. व त्यानुसार दि.१२ मार्च २०२४ रोजी याबाबतचा अधिकृत शासननिर्णय आला होता.या शासन निर्णयात सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी. व ही कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करावी असे नमूद केले आहे. हा शासननिर्णय येऊन लवकरच एक महिना पूर्ण होणार आहे.

सद्यस्थितीत निवडणूक विषयक काम सुरु आहे. याची संघटनेस कल्पना आहे. परंतु शासननिर्णयात जे आदेश दिले आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी व लवकरात लवकर हिरडा नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती किसान सभेने केली आहे.निवेदनावर किसान सभेचे ॲड. नाथा शिंगाडे, डॉ. अमोल वाघमारे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, राजू घोडे, महेंद्र थोरात, आमोद गरुड, विकास भाईक, लक्ष्मण जोशी, गणपत घोडे, रामदास लोहकरे, कमल बांबळे, बाळू काठे यांची नावे आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button