(दुर्गम आदिवासी भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्याने टँकरची मागणी)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुत्रर तालुक्याच्या उत्तरेकडील म्हणजेच विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेल्या कोपरे जांभुळशी सह दुर्गम आदिवासी भागात तसेच पूर्व भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून,टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी होऊ लागली आहे.
पंचायत समितीकडे टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी एकूण १८ गावे व परिसरातील प्रस्ताव सादर केले आहेत.यापैकी १६ प्रस्ताव मंजूर झाले असून आंबे आणि सोनावळे येथील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.तालुक्यात सध्या ९ टँकरने पिण्याचे पाणीपुरवठा करण्यात येत असून,टँकर उपलब्ध होताच लवकरच उर्वरित सात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असत्याचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व सहाय्यक गटविकास अधिकारी नीलेश बुधवंत यांनी दिली.
यंदा २८ मार्च पासून शिंदेवाडी गावठाण तसेच उक्तावस्ती गणपीरवस्ती, शिंदेवाडी,व्हारंडी,दमडी, रामवाडी,कापूरवाडी,येथील दोन हजार ३० लोकसंख्येला दोन खेपा तसेच पेमदरा गावठाण व तुकाचामळा, टिटेवाडी,खटकाळी,भोसलेवाडी, कारवाडी,लवणवस्ती,ठाकरवस्ती येथील २ हजार ४५० लोकसंख्येला ३ खेपांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गोद्रे गावच्या उतळेवाडी, भोजनेवाडी, कपाटवाडी,वडाचामाळ,ठाकरवाडी,रामकरवस्ती, सुरकुलवाडी येथील १ हजार ५५ लोकसंख्येला दोन खेपा तसेच मांडवे गावच्या पुताचीवाडी, गुडघेवाडी,शैलाचामाळ,तळपेवस्ती,दाभाडेवस्ती,जोशीवस्ती, उंबरवस्ती,बुळेवस्ती,मुधाळणे,गावठाणवाडी,दरेवस्ती, शिंदीफाटा,मारकुलवाडी येथील ८६५ लोकसंख्येलाचार खेपा द्वारे २९ मार्चपासून पाणीपुरवठाकरण्यात येत आहे.सीतेवाडी,काठेवाडी,जोशीवाडी,गुळेवाडी येथील ५९०लोकसंख्येला ३० मार्चपासून तर आणे,आनंदवाडी,माळवाडी,गोडेशेत,तरळदरा,देवस्ती शिंदे- फाटा,मारकुलवाडी येथील ३ हजार २७० लोकसंख्येला,
अंजनावळे गावठाण पसारवाडी,लव्हाळीवस्ती, दनानेवस्ती येथील १ हजार २५८ व निमगिरी खांडेची वाडी येथील ६५० लोकसंख्येला ५ एप्रिल टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे.कोपरे जांभूळशी,काठेवस्ती, कुडाळवाडी,बांगरवाडी,काठेवाडी,कवठेवस्ती, माळीवाडी खांडेवस्ती येथील ९२२ लोकसंख्येला ६ एप्रिलपासून २ खेपांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गुळुंचवाडी गावठाण ठाकरवस्ती गणेशनगर खंडोबामाळ घायटावस्ती (लोकसंख्या १५००), हडसर पेठेचीवाडी (३५०), नळावणे गावठाण नवलेवाडी सुरकुळवाडी मोलदरा (१३६१) बांगरवाडी गावठाण (१४१०) सुकाळवेढे गावठाण ढेगळेवाडी (४९६) आलमे गावठाण, खंजीरवाडी, वंदेवस्ती, पिराचीवाडी, आश्रमशाळा पाझरतलाव, मुक्ताईवस्ती, गणेशनगर (२२६९) हातविज, सुपेवाडी, दुर्गवाडी (४३०) येथील टॅंकर प्रस्ताव मंजूर आहेत.