प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
श्री पांडुरंग विद्यालय विठ्ठलवाडी ता.शिरुर येथे दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी ली.मुंबई या पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेटी दरम्यान शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत सेकंडरी पतसंस्थेवर आपण ठेवलेला विश्वासास पात्र असे कामकाज संस्था करत आहे.संस्थेने माहाबळेश्वर येथे नुकतीच 11 गुंठे जागा खरेदी केली असून त्या जागेवर संस्थेचे नवीन बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आश्वासित केले.
भविष्यात सभासदांच्या ठेवीवर आकर्षक व्याजदर देणार असून कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा मनोदय आहे. शिक्रापूर शाखेची सभासद संख्या1000 पर्यंत करावी असे अवाहन करून जवळचे पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील सभासद करण्यासाठी प्रयत्न करावे असे याप्रसंगी सांगीतले. पतसंस्थेच्या जीवन सुरक्षा ठेव योजनेबरोबरच मेडिक्लेम योजनेला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे भविष्यात संस्थेचे मोबाईल ॲप सुरु करणार असून सभासदांना त्याचा निश्चितच फायदा होईल.
संस्था सभासदाचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार सतेश शिंदे,टी.डी.एफचे राज्य प्रवक्ते दादासाहेब गवारे ,विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ,एकनाथ चव्हाण ,प्रकाश गावडे ,मोहन दरेकर, वसंत रणसिंग ,खेडेकर सर,शिरुर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष नवनाथ धुमाळ, संदिप गवारे,शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र चौधरी ,प्रकाश राऊत,नरवडे सर,नवले सर श्री गोरे सर, सुखदेव नारनोर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा सेकंडरी पतसंस्थेचे संचालक तुकाराम बेनके यांनी केले तर आभार पुणे जिल्हा कला अध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्रवीण जगताप यांनी मानले.