जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
खामुंडी ता:-जुन्नर येथे गावच्या हद्दीतील नगर- कल्याण महामार्गावर शेतमजुरांना घेऊन चाललेली पिकअप गाडी उलटली.यामुळे झालेल्या अपघातात ११ कामगार किरकोळ जखमी झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत ओतूर पोलिसात पिकअप चालक शिवाजी बुगदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर नामदेव बिंधू भौरले यांनी फिर्याद दिली आहे.अपघात मीना किसन कोरडे (वय ३५, रा.उदापूर), सुनीता युवराज दिघे (वय २५ रा. मांडवे), विलास नामदेव तांबे (वय ४३, रा.ओतूर), खरकीनी राजू भांगरे (वय ३० जुन्नर), पाळबाई बाळू बुळे (वय ५० रा. मांडवे), सुनीता बडोले (वय ३०, रा.बनकरफाटा), शांताबाई बबन शिंदे (वय ४५, रा. उदापूर) सर्वांचा तालुका जुन्नर व जिल्हा पुणे तर नगर जिल्हातील अकोले तालुक्यातील रेखा तुकाराम कटुले (वय ३१ रा. बलठण)अंजना कृष्णा साबळे (वय ३४, रा. पिंपरी), सावित्रा मारुती साबळे (वय 84 रा. पिंपरी),सुंदराबाई सखाराम भांगरे (वय ४०, रा. सिसवद ता.अकोले) हे जखमी झाले असल्याची माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.तर इतर जखमींची नावे कळू शकली नाही.
बनकरफाटा येथून सकाळी आठ वाजता शेतात कामा साठी शेतमजूर घेऊन वडगाव आनंद येथे निघालेली पिकअप डुंबरवाडी टोलनाका ओलांडून गेल्या नंतर खामुंडी गावच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे उलटली झाली.त्यामुळे गाडीमधील शेतमजूर जखमी झाले.स्थानिक नागरिक व ओतूर पोलिसांनी सर्व जखमी शेतमजुरांना उपचारासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात व आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक करीत आहे.