जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
अहमदनगर कल्याण रविवार दिनांक:-७ एप्रिल रोजी सकाळी बनकरफाटा येथील मजूर अड्ड्यावरून साधारणतः अकरा मजूर महिला व पुरुषांना घेऊन पिकअप एमएच १४ एचयू ०३९१ चालक शिवाजी बुगदे उदापुर हे राष्ट्रीय महामार्ग वरून खामुंडी येथे शेतात जात असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळच सकाळी ठीक आठ वाजता पोहचले असताना मागून आलेल्या वाहनाने धडक दिली ज्यामुळे पिकअप उताराने खाली पलटी झाल्याने अपघात झाला यावेळी दोन मजुर जखमी झाल्याचे समजले असून त्यांना आळेफाटा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नगर -कल्याण महामार्गावर सतत काही ना काही घटना घडत असतात आणि त्यामुळे घटना घडत असल्यामुळे त्या घटनांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे अनेकांचे जीव पण जात आहे याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे घटना आहे ती म्हणजे नगर कल्याण महामार्गावर जुन्नरतालुक्यातील बनकरफाटा या ठिकाणावरून काही मजूर जात असताना त्यांचा पिकप पलटी झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील मजुरांना नेने आणण्यासाठी पिकप अन्य वाहतूक या ठिकाणी वापरली जाते या वाहतुकीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मजूर भरून वाहतूक या रस्त्यावरून जातात हे वाहतूक करत असताना गाड्यांचा स्पीड पण जास्त प्रमाणात असतो हे वाहतूक करत असताना याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नाही.यामुळे कल्याण अहमदनगर महामार्गावर अपघाताची मालिका सतत चालू आहे या अगोदर या महामार्गावर आणि प्रकारचे अपघात झाले आहे यामध्ये अनेक तरुणांचा जीव गमावला आहे या गोष्टीकडे लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष द्यावे असे जनतेतून बोलले जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस पथक अपघातस्थळी पोहचले असून ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप भोते व संतोष भोसले पुढील तपास करीत आहेत.