जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
आज रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आगर येथील खोरे वस्तीतील रुक्मिणी मंगल कार्यालयात डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या वतीने “आस्था” कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३२ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीन द्वारे तपासणी करण्यात आली.
तपासणीमध्ये जर संशयित रुग्ण आढळला तर त्यांच्या पुढील तपासण्या ह्या डेरे हॉस्पिटल ,नारायगाव येथे अल्प दरात केल्या जाणार असल्याचे डॉ. समीर डेरे यांनी सांगितले.
याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव फकीर आतार, तपासणी तज्ञ सपना बेलवटे, शुभांगी आराख, अशा सेविका पूनम गाडेकर , रुपाली मंडलिक, समन्वयक योगेश वाघचौरे इत्यादी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विश्वास काळे, माजी सरपंच संजय गाडेकर, प्रवीण गाडेकर, उत्तम महाबरे, तुषार शेटे, अरुण तांबे व गोकुळ महाबरे यांनी मोलाचे सहकार्य केले.