जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
शिरोली बुद्रुक तेजेवाडी शिरोली खुर्द या गावातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये शेती साठी जनावरांच्या चाऱ्यासाठी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे या हेतूने गावच्या उत्तरेला कुकडी नदी वरती हा बंधारा बांधण्यात आला.
परंतु काही दिवसांपूर्वी या बंधाऱ्यातून पाण्याचे गळती सुरू झाल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त दिवस राहणारे पाणी हे गळतीमुळे एकदम कमी दिवस राहत असल्यामुळे या बंधाऱ्यावरती वरती असलेल्या मोटारी लवकरच तळ काढतात .
नारायणगाव या ठिकाणी कुकडी प्रकल्प पाटबंधारे विभागाचे कार्यालय असून या संबंधित विभागाच्या वतीने बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु हे काम तात्पुरती मलमपट्टी केल्यासारखे असल्यामुळे किंवा या कामाला पाहिजे तसे कॉलिटी मटेरियल न वापरल्यामुळे गेले अनेक दिवसापासून या बंधाऱ्याला मोठ्या स्वरूपाचे भगदाड पडले असून त्याच्यातून पाण्याचा विसर्ग हा जास्त प्रमाणात होत असल्यामुळे नजीकच्या तीन ते चार दिवसांमध्येच हा बंधारा कोरडा पडण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे या निकृष्ट दर्जाच्या कामाला जबाबदार कोण किंवा यात काही अपहार झालेला आहे का असाही सवाल ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित करीत असून भविष्यात याची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई न केल्यास जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने नारायणगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यालया बाहेर बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
निकृष्ट दर्जाचे काम होऊन ठेकेदार मात्र एसी ऑफिस मध्ये बसणार परंतु त्याच्या झळा दुष्काळाच्या परिस्थितीत शेवटी शेतकऱ्यांना सोसाव्या लागणार . पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बंधाऱ्याची पाहणी केली असून ते वरिष्ठांना याबाबतची माहिती देऊन देणार आहेत.