जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
“जिल्हा शिक्षण मंडळाच्या,अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथे वार्षिक “पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभ”मोठ्या आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला.अशी माहिती प्राचार्य महेंद्र अवघडे व प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी दिली.
सदर पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये शैक्षणिकक्षेत्र, क्रीडा क्षेत्रात, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास मंडळ या विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यायाच्या वतीने प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.प्रमुख पाहुणे राष्ट्रीय खेळाडू डॉ.विक्रम फाले मनोगतात म्हणाले,”कोणत्याही क्षेत्रात गुरू शिवाय माणसांची जडण घडण होत नाही. आपल्याकडील ऊर्जेचा विधायक वापर करा.”शिवव्याख्याते मा.प्रा.एस.झेड.देशमुख मनोगतात म्हणाले,”आजच्या विद्यार्थ्यांनी चांगले वाचले व श्रवण केले पाहिजे.जे जे उत्कृष्ठ आहे.ते ते शोधले पाहिजे.देव,देश व धर्मावर प्रेम करा.
“महाविद्यालय विकास समितीचे सदस्यअनिल तांबे, राजेंद्र डुंबरे,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.के.एल.बनसोडे,उपप्राचार्य डॉ.के.डी.सोनावणे, उपप्राचार्य डॉ.रमेश शिरसाट,एन.एस. एस.प्रमुख डॉ.ए.एम.बिबे,सांस्कृतिक विभागाचे डॉ.ए.के.लोंढे , क्रीडा व शा. शि. संचालक डॉ.यू.पी.पनेरू,विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ एस.एस.लंगडे,एन.सी.सी. प्रमुख डॉ.निलेश हांडे,भानुविलास गाढवे,भरत डुंबरे, शंकर पोळ आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विनायक कुंडलिक व डॉ.अजय कवाडे तसेच आभार डॉ.कल्याण सोनावणे यांनी मानले.