माळशेज प्रतिनिधी:-रविंद्र भोर
डॉ.वलव्हणकर हॉस्पिटलच्या वर्षपूर्ती निमित्ताने डॉ.वलव्हणकर दांपत्याने जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथी जिल्हा परिषद शाळा व भैरवनाथ विद्यालयातील गरीब,गरजू १६० विद्यार्थ्यांना शाळेय पेन-पेन्सिल,खोडरबर त्या सोबत खाऊ वाटप करण्यात आले.अशी माहिती डॉ.अवधूत व डॉ.आदीती वलव्हणकर यांनी दिली.
अधिक माहिती देतांना ते म्हणाले की मागील एक वार्षपूर्वी म्हणजे ४ एप्रिल२०२३ रोजी डॉ.अवधूत वलव्हकर यांनी जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथे आपले स्वतःचे क्लिनिक सुरू करून या खेडेगावात आपली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. याचेच औचित्य साधून गुरुवार दि,:-४ एप्रिल २०२४ रोजी याच गावातील जिल्हा परिषद शाळा व भैरवनाथ विद्यालयाती सर्व १६० उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा संकल्प पूर्ण केला. या कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय वायकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ अर्पण करून करण्यात आले. यावेळी उदापुर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन वलव्हकरकर,कोपरे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कवटे,डॉ. अवधूत वलव्हणकर,डॉ.अदिती वलव्हणकर,हिवरे खुर्द सरपंच मनिष बर्डे,उपसरपंच लक्ष्मण वायकर,माजी सरपंच राजेंद्र वायकर,माजी तंटामुक्ती अध्यक्ष अमोल वायकर, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशोक वायकर, विश्वास वायकर, सर्व जेष्ठ नागरिक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मोहन वलव्हणकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की खेड्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यात हल्ली कोणीही तयार नसते मात्र डॉ. वलव्हणकर यांनी व्यवसाय करण्यासाठी ग्रामीण भागाची निवड केली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे याशिवाय या वर्षात अनेक आरोग्य शिबीर घेऊन सर्वांना आरोग्यासाठी सेवा पुरविण्यात सक्षमता दाखवली आणि सामाजिक कार्य म्हणून शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचे काम देखील करीत आहेत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश वायकर यांनी केले तर आभार रोहिदास वायकर यांनी मानले.यावेळी शिक्षक,पालकवर्ग उपस्थित होते.