जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

जुन्नर तालुक्यातील उदापुर गावचे आदर्श माजी सरपंच कै. बबनदादा कुलवडे यांनी अनेक वर्षापासून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या सुखदुः‌खात प्रत्यक्ष सहभागी राहुन उदापूर गावातील जनतेची अविरत सेवा केली आहे त्यांच्या अचानक जाण्याने गावावरच नव्हे तर माळशेज पट्ट्यातील सर्व परिसरावर शोककळा पसरली त्यांनी जोपासलेल्या गोरगरीब जनतेच्या सेवेचे अविरत कार्य पुढे कायम चालू ठेवण्यासाठी स्वर्गीय बबनदादा निवृत्ती कुलवडे सेवार्थ ट्रस्टची स्थापना करून उदापूरच्या ग्रामस्थांनी गोरगरीब जनतेच्या आरोग्य व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्यासाठी पुढाकार घेणार आहे

तसेच या सेवार्थ ट्रस्टचे उद्दिष्टे सफलकरण्यासाठी अनेक समाजसेवक सढळ हाताने मदत करत असल्याचे सेवार्थ ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास शिंदे यांनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.स्वर्गीय बबनदादा निवृत्ती कुलवडे सेवार्थ ट्रस्ट कार्यालयाचे उद्घाटन श्रीमती रंजना बबनराव कुलवडे यांच्या शुभहस्ते महात्मा फुले चौक येथे संपन्न करण्यातआले तसेच हा कार्यक्रम माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असताना, माजी आमदार शरद सोनवणे,चेअरमन सत्यशील शेरकर,शरदराव लेंडे,अंकुश आमले,मोहित ढमाले, माऊली खंडागळे, शरदआण्णा चौधरी,संभाजी तांबे, तुषार थोरात,प्रियंका शेळके,शोभा शिंदे,ज्योत्स्रामहाबरे,दिलीप डुंबरे, सारंग घोलप,बुधाजी शिंगाडे, विकास राऊत,महेंद्र सदाकाळ,मनोहर लोहोटे,पांडुरंग शिंदे,प्रभाकर शिंदे,बाजीराव कुलवडे,अशोक शिंदे, जालिंदर शिंदे,किशोर होनराव,शांताराम बटवाल,मोहन वलव्हणकर,शुभम महाकाळ,तुषार डोके,संपत लोहोटे, सागर मंडलिक,जयवंत शेरकर,धनंजय डुंबरे,प्रकाश कुलवडे,सुदर्शन शिंदे,गणेश जाधव,राजेंद्र शिंदे,यांसह सरपंच उपसरपंच सर्व सदस्य,सेवार्थ ट्रस्टचे सर्व सदस्य,विविध पदाधिकारी समस्त ग्रामस्थ उदापूर मुंबईकर व पुणेकर तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष रोहिदास शिंदे,आभार डॉ.पुष्पलता शिंदे यांनी मानले

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button