शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकणारे निमोणे या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी परशुराम अनुसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निमोणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पार्वती बाप्पू सूर्यवंशी यांनी दुसऱ्या सदस्याला संधी मिळावी म्हणून आठ दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या जागी ग्रा.पं.सदस्य परशुराम भाऊसो अनुसे या कृषी पदवीधर असलेल्या युवकाची बिनविरोध निवड करण्यात आली.
अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच संजय काळे व सहायक ग्रामविकास अधिकारी बी.बी शेळके यांनी दिली.या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. ग्रामपंचायतीची पुढील विकास कामे दलित वस्तीतील कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ निमोणे व सुंदर निमोणे परिसर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस कृषी पदवीधर परशुराम अनुसे यांनी बोलून दाखविला आहे.
या निवडीदरम्यान सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटी चेअरमन, संचालक, पुणे जिल्ह्यामधील सर्व आजी,- माजी राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग, समस्त-ग्रामस्थ निमोणे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहुन नवनिर्वाचित उपसरपंच परशुराम भाऊसो अनुसे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.