जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर 1
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएससी मान्यता- प्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य आंतर शालेय कराटे चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे व क्रीडा संचालक एच.पी.नरसुडे यांनी दिली.जुन्नर येथे महाराष्ट्र राज्य आंतर शालेय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा २०२४ नुकत्याच आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुल च्या आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी एक सुवर्णपदक,दोन रौप्यपदक व तीन कांस्यपदक मिळविले.श्रेयश म्हस्के यास सुवर्णपदक,संस्कारभांबेरे व प्रणव गाजरे यांना रौप्य पदक तर उत्कर्ष बेलकर, सर्वेश वाघ आणि सोहम शेलार यांना कांस्यपदक मिळाले.तसेच रुद्र आहेर व गौरी चौधरी यांना सहभाग बाबतचे प्रमाणपत्र मिळाले.या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,सारिका शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,सर्व विभागाचे प्राचार्य व विभाग प्रमुख व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.