जुन्नर प्रतिनिधी- सचिन थोरवे
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु या शाखेत राष्ट्रीय हरित सेना सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत. 20 मार्च जागतिक चिमणी दिन विद्यालयात साजरा करण्यात आला. श्री खेडकर जे जी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यालयाच्या पर्यवेक्षक सौअनघा घोडके पक्षांच्या सवयी वातावरणात होणारे बदल शहरीकरण पक्षांचे वास्तव्य धोक्यात कश्या प्रकारे येत आहे याबाबत माहिती दिली. आधुनिकीकरण त्यामध्ये यांनी निमित्त उन्हाळ्या मध्ये पक्षांची पाण्याची व अन्न धान्याची होणारी गैरसोय हे पाहता विद्यालयात चिमण्यांसाठी घरटी व चिमण्यांसाठी पाणपोई व धान्य कोठार तयार करण्यात आली व ही घरटी विद्यालय परिसरात झाडांवर लावली.
चिमण्यांनी त्या तयार केलेल्या मानवनिर्मित घरट्यात आपला संसार थाटला आहे. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर स्नेल कील सारखी कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरत आहेत व त्याच्या संपर्कात लाखो पक्षी येऊन मुत्यूमुखी पडत आहेत. त्यातून कीटकनाशके वापर टाळा हा संदेशही देण्यात आला हि माहिती राष्ट्रीय हरितसेना प्रमुख श्री देवकुळे एस व्ही यांनी दिली . तर साई ढोमसे या विद्यार्थ्याने घरटे तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून त्यासाठीचे साहित्य याबाबत माहिती दिली. इ 6 वी ब च्या विद्यार्थ्यांनी 50 पक्षांची घरटी व 30 पाणपोई व 25अन्न कोठारे साई ढोमसे , आयुष नलावडे, श्लोक विधाटे, साई बोहाडे, पार्थ बोऱ्हाडे, शौर्य विधाटे, विराज विधाटे, समर्थ गांगुर्डे, वेदांत नवले, प्रणव नवले, मयांक विधाटे, पवन गंगुले, अमित नायकोडी, स्वराज मोरे , प्रथमेश पारवे , ओम डोके, रोहन भोजणे, समर्थ बोचरे, हर्षवर्धन विधाटे , साई खैरे, मयूर राठोड, विराज ढोमसे, सिद्धार्थ सोमोशी ,आर्या ढोमसे, समिक्षा शिंदे, संस्कृती ढोमसे, शर्वरी नवले , संस्कृती शिंपणकर, राजश्री केदार, प्रतिक्षा फुंदे, मानसी डोके , आराध्या थोरवे, संस्कृती ढोमसे, समृद्धी थोरवे, तनिशा हांडे, आदिती जगताप, स्वरा शिंदे, स्वराली जाधव, सिध्दी बोऱ्हाडे ,वैष्णवी गाडे या विद्यार्थ्यांनी तयार केली एकूण 43 विद्यार्थ्यानी या उपक्रमात सहभाग घेतला.
विभागाचे राष्ट्रीय हरितसेना प्रमुख श्री देवकुळे एस व्ही श्री भालिंगे व्ही एस श्री निधन टी पी सौ मुंढे आर एस सौ नलावडे आर के यांनी विद्यार्थ्यां कडून कार्यानुभव विषया अंतर्गत घ्या साहित्याची निर्मिती करून घेतली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा श्री प्रसाद हांडे सर यांनी उपक्रमाकरीता विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मराठी विषय अध्यापिका श्रीम. पादीर एस बी यांनी केले.