प्रतिनिधी -जिजाबाई थिटे
केंदूर (थिटेवाडी)ता.शिरूर येथील शेतकरी राजाराम जयवंत थिटे यांची कन्या स्नेहल राजाराम थिटे हिची ठाणे जिल्हा वनरक्षक पदी निवड झाली.सुरुवातीपासूनचेच हे तिचे ध्येय गाठण्यासाठी तिने आपार कष्ट घेतले. तिचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडी,पाचवी ते बारावीचे शिक्षण श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ या ठिकाणी झाले. स्नेहल सध्या वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ येथे पूर्ण करत आहे.
ग्रामीण भागात राहूनही गेली दोन वर्ष अनेक समस्यावर मात करून तिने हे यश संपादन केले आहे तिच्या या यशाबद्दल श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर,श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अविनाश क्षीरसागर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडीचे मुख्याध्यापक मंगेश गावडे यांनी अभिनंदन केले.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांसमोर स्नेहल थिटे ही आदर्श असल्याचे मत डॉ.संजय घोडेकर यांनी व्यक्त केले.माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी ता.आंबेगाव जि.पुणेचे सागर जाधव व प्रसाद चौधरी,राहुल पडवळ यांनी विशेष मार्गदर्शन केले तिच्या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिरूर तालुक्याचे माजी सभापती सदाशिवराव थिटे,मा.जिल्हा परिषद सदस्या सविताताई बगाटे,शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड.दत्तात्रय थिटे,उपसरपंच भाऊसाहेब थिटे,सुनिल थिटे,विशाल थिटे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे यांनी विशेष कौतुक केले.