जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर व माणसांवर सातत्याने हल्ले होत आहे पिंपळवंडी ता:- जुन्नर येथे भिंतीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणावर हल्ला केला मात्र या तरूणने प्रसंगावधानता दाखविल्यामुळे हा तरुण थोडक्यात बचावला ही घटना मंगळवारी दि:- १९ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली प्रदीप गंगाराम माळी वय १९वर्षे असे बिबट्याच्या हल्ल्यामधुन वाचलेल्या तरुणाचे नाव आहे
याबाबत माहिती अशी की पिंपळवंडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सार्वजनिक शौचालय आहे प्रदीप हा सार्वजनिक शौचालयाकडे रात्रीच्या वेळी जात असताना त्याच्या हातात असलेल्या विजेरीचा उजेड सुलभ शौचालयाच्या भिंतीवर दबाधरून बसलेल्या बिबट्यावर पडला त्यानंतर अचानक बिबट्याने प्रदीपच्या अंगावर झेप घेतली असता प्रदीप हा वेगाने ओरडत घराच्या दिशेने पळाला तो,पळत असताना एका ठिकाणी पडला व त्यानंतर पुन्हा उठुन पळाला बिबट्या प्रदीप याच्या पाठीमागेच येत होता. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने प्रदिपची आई व घरातील सदस्य बाहेर आले.त्यांनी देखील मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथुन पळ काढला दैव बलवत्तर म्हणून आपण बिबट्याच्या हल्ल्यामधुन वाचलो असल्याची भावना यावेळी त्याने व्यक्त केली
पिंपळवंडी परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कांदळी या ठिकाणी मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात मंगेश गुंजाळ या तरूणाचा मृत्यू झाला होता त्यानंतर दोन ते तिन दिवसातच उंब्रज या ठिकाणी एका बालकावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे आयूष सचिन शिंदे हा चार वर्षाचा बालक गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली होती या दोन्हीही घटना ताज्या असतानाच पिंपळवंडी येथील तरुणावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य शामभाऊ माळी व येथील ग्रामस्थांनी केली आहे.