जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
मंगळवार दि. २९ मार्च २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,आळे येथे डिसेंट फाउंडेशन पुणे, सुवर्णयुग युवा मंच आळेफाटा,आर झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल,श्री हॉस्पिटल आळेफाटा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आळे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,हृदयरोग व मूत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी २०५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ४० रुग्णांना पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसह, प्रवास, निवास, जेवण व एक महिन्यांचा औषधांचा खर्च मोफत केला जाणार आहे.
याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,सचिव फकीर आतार,पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे,जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती अध्यक्ष प्रा.एकनाथ डोंगरे,शंकरा आय हॉस्पिटलचे प्रमुख समन्वयक प्रकाश पाटील, श्री हॉस्पिटलचे डॉ.शुभम कारंजकर, डॉ.प्रकाश टाले , विकास डुबे, प्राथमिक आरोग्य केंद्र आळे च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुबिना शेख, डॉ प्रियांका वेठेकर,निलेश शिंदे, ह भ प रमेश ढोमसे,शंकरराव भिसे,भिवाजी माळवे,माजी सैनिक जालिंदर माळी, माजी सैनिक उमेश डोंगरे,ज्येष्ठ नागरिक संघ आळे, संतवाडी, कोळवाडीचे अध्यक्ष भागाजी शेळके, उपाध्यक्ष किसन जाधव,सचिव शिवाजी कुऱ्हाडे, सहसचिव नामदेव दिघे, सुंदर कुऱ्हाडे आदी मान्यवर व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ आळे,संतवाडी,कोळवाडी च्या सर्व सदस्य तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आळे च्या परिचारिका व आशा सेविका यांनी सहकार्य केले.