जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
सोमवार दिनांक १८ मार्च २०२४ रोजी मढ येथे डिसेंट फाउंडेशन पुणे,आर झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल,ग्रामपंचायत मढ व प्राथमिक आरोग्य केंद्र मढ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरा मध्ये १६४ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून ५३ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठवण्यात आले.
या रुग्णांची शस्त्रक्रिया ही मोफत होणार असून त्यांना प्रवास,निवास,जेवण व एक महिन्याची औषधे मोफत दिली जाणार आहेत.तसेच श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या सहकार्याने हृदयरोग व मूत्र रोग तपासणी शिबीरही आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी डिसेंट फाउंडेशन चे सचिव फकीर आतार, शंकरा आय हॉस्पिटल चे शिबीर समन्वयक प्रकाश पाटील,श्री हॉस्पिटलचे डॉ.शुभम कारंजकर डॉ.प्रसाद टाले,संतोष शिंदे,विकास डुबे,जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.एकनाथ डोंगरे, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळ, शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग मोढवे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.सरोक्ते मॅडम,परिचारिका प्रिया शिरसाट, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा सेविका व मढ,तळेरान,सीतेवाडी,पारगाव,करंजाळे आणि जुन्नर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी प्रयत्न केले.