जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर आयोजित शिक्षक समता वृद्धी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.दि.१४/०३/२०२४ रोजी स्त्री शिक्षणाच्या आद्यकर्त्या सावित्रीबाई फुले व संस्थेचे संस्थापक स्वर्गीय बाबुरावजी घोलप यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मा.प्राचार्य डॉ अवघडे एम.आर.यांच्या हस्ते करून सुरुवात करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवराचे स्वागत श्रीमती गोपाळे यांनी स्वागत गीत गाऊन केले.यामध्ये बारा मास्टर ट्रेनी, यांनी सहभागी १०० शिक्षक प्रशिक्षणार्थी, यामध्ये उपप्राचार्य, प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक यांना मार्गदर्शन करण्यात आले.यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20-20 मध्ये शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकांचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने हे प्रशिक्षण राबविण्यात आले.
याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांनी प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये बदल घडविण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होईल असे शिंदे यांनी सांगितले.प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून रवींद्र तोरणे यांनी कामकाज पाहिले. तसेच प्रशिक्षणाचा समारोप होत असताना लोकशाही अधिक बळकट व्हावी व शिक्षकांनी मतदार जागृती बाबत सजग होऊन काम करावे म्हणून सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितोळे यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयाचे विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.शिरसाट व तसेच उपप्राचार्य के.डी सोनवणे व कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बनसोडे अमृत व इतर महाविद्यालयातून आलेले मुख्याध्यापक प्राचार्य उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, आदी उपस्थित होते.