शिरूर प्रतिनिधी -शकील मनियार
शिरूर येथील न्यायालयातील न्हावरे येथील भूमिपुत्र द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे शिरूर तालुका कायदेविषयी सल्लागार ॲड.युन्नुस करीम मनियार यांची नोटरी पदावर निवड करण्यात आली. घोडनदी(शिरूर) येथील कोर्टात गेले पंचवीस वर्षे दिवाणी व फौजदारी वकीली प्रॅक्टीस करत आहे. ते सन1994 पासून प्रॅव्टीस करत आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड वसंतराव कोरेकर उर्फ काका हे त्यांचे गुरु आहेत. गेले अनेक वर्षे मनियार आणि कोरेकर एकाच चेंबर मध्ये काम करतात. कोरेकर काकांची मोलाची साथ त्यांना मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे गेली सन 1994 ते आजपर्यंत ॲड. वसंतराव कोरेकर काका आणि ॲड. युन्नुस मनियार एकाच चेंबर्स मध्येच वकील व्यवसाय एकत्र करतात. काकांची मोलाची साथ त्यांना लाभली आहे तसेच मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
राज्यभरात वकिली व्यवसाय करणाऱ्यांना १४ हजार ६४८ वकिलांची नोटरी म्हणून केंद्र सरकारने गुरुवार दिनांक १४ मार्च रोजी नियुक्तीची यादी जाहीर केली असल्याने वकील क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. नोटरी पदवी मिळालेल्या वकिलांमध्ये शिरूर तालुक्यात 60 जणांची वर्णी लागली आहे. ग्रामीण भागात विविध प्रमाण पत्र व दाखले प्रमाणित करण्यासाठी नोटरी वकिलांची गरज असते. सध्यस्थितीत नोटरी धारक वकिलांची संख्या फारच कमी होती.
केंद्र सरकारने मोठ्याप्रमाणात नोटरी धारक नियुक्त्या केल्यामुळे नागरिक, विध्यार्थी व व्यावसायिकांची सोय होणार असल्याचे शिरूर तालुका बार असोसिएशन शिरूर अध्यक्ष अॅड. परेश थोरात यांनी सांगितले. नोटरी मिळवण्यासाठी वकिली व्यवसायात १० वर्षाचा अनुभव व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते. त्यांच्या ऑनलाइन मुलाखती झाल्या होत्या त्यानंतर नोटरीची पदवी बहाल करण्यात आली आहे. वकील हे कायदेशीर व्यावसायिक असून. काही कायदेशीर कामे करण्यासाठी अधिकृतपणे स्वाक्षरी पाहणे, शपथ घेणे व कागदपत्रे प्रमाणित करणे व व्यवहारांची वैधता प्रमाणित करण्याचा अधिकार त्यांना आहे. रजिस्टरमध्ये नोंद केलेली नोटरी म्हणजेच रजिस्टर्ड नोटरी समजली जाते. प्रत्येक नोटरीला आलेला दस्त आपल्या रजिस्टर मध्ये नोंद करणे कायदयाने बंधनकारक आहे. प्रत्येक नोंद दस्तावर नोंदणी नंबर लिहुन आवश्यक ती तिकीटे लावावी लागतात.
ॲड.युन्नुस मनियार यांची निवड झाल्याबद्दल शिरूर शहरातुन तसेच पंचक्रोशीतून त्यांच्यावरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे.