जुन्नर तालुका प्रतिनिधी :- रविंद्र भोर
जुन्नर तालुक्याचा उत्तरेकडील भाग म्हणजे सह्याद्री पर्वताच्या रांगांनी व जंगल झाडीने व्यापला असून या जंगलात विविध प्रकारची औषधी वनस्पती त्याचप्रमाणे नानाविविध प्रकारची गावरान फळे देणारी झाडे व लता(वेली)यांचा मोठा बहार आढळून येतो सध्या निसर्गाने या भागात रांनमेव्याची उधळण सुरू असून हा रानमेवा गोळा करण्यासाठी आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे.
जुन्नरच्या उत्तरेकडे कोपरे,मांडवे,मुथाळणे, फोफसंडी,जांभुळशी,डिंगोरे, आलमे, बल्लाळवाडी, माळशेज घाट,हरीचंद्रगड,खिरेश्वर,खुबी -करांजळे, तळेरानं,पारगाव,मढ,सीतेवाडी,पिंपळगाव-जोगा, तळेरान,वसईवाडी,हडसर,निमगिरी,नाणेघाट,दाऱ्या घाट सांगणोरे,गवारवाडी,वाटखळ,भलेवाडी,मादारणे ,सारणी,चिल्हेवाडी,पाचघर, रोहकडी,आंबेगव्हाण, लागाचा घाट या आदिवासी गावांच्या परिसरात असणाऱ्या जंगलात सध्या डोंगराची काळी मैना म्हणून प्रसिद्ध आणि लोकांच्या पसंतीला पडलेल्या करवंदे या रानमेव्यासहित आंभोळ्या,गावरान कैऱ्या(आंबे) सिंदोळ्या,या शिवाय काजू या फळांनी झाडांना पाडाला लागले असून तर काहो फळे पिकून परिपक्व झाले असून आदिवासी बांधव या गावरान मेव्याला जंगलातून गोळा करून शहरी भागातील खवव्यांना विकण्यासाठी पाटीत भरून फेरी करताना दिसून येत आहेत.
याच भागातील जंगलात मोठ्या प्रमाणावर आर्युवेदीक औषधी वनस्पतींची देखील संकलन केले जाते यानिमित्ताने आदिवासी बांधवांना एकप्रकारे व्यवसाय प्राप्त झाला आहे.मात्र मागील दोन वर्षे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सरकारचे नियम पालन करण्याचा आदेश यामुळे शहरातील लोकांना या रानमेवा खाण्यास वंचित राहावे लागले होते तर आदिवासी बांधवांना या फळांची विक्री करून आर्थिक उत्पन्न करण्यास मुकावे लागले होते मात्र यंदा जुन्नरच्या सह्याद्री पर्वताच्या जंगलात रानमेवा गोळा करण्यासाठी आदिवासी बांधवांची लगबग सुरु झाली असून सर्व आलबेल राहिले तर सर्वांना रानमेवा चाखता येणार आहे व आदिवासी बांधवांना उत्पन्नाचा मार्ग मोकळा होणार आहे.