प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे
वन्य पशुपक्षी व सामाजिक संस्था सांगवी पुणे या संस्थेच्या वतीने नागपंचमीचे औचित्य साधत श्री भैरवनाथ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा या ठिकाणी छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आप्पासाहेब बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली ” साप जगवा निसर्ग वाचवा ” या अभियानांतर्गत सापांविषयी माहिती व जनजागृती करण्यात आली .
महाराष्ट्रात प्रामुख्याने सापांच्या 200 ते 250 जाती प्रजाती असून मण्यार , घोणस व नाग या विषारी जाती असून बाकीच्या सर्व बिनविषारी असून शेतकऱ्यांच्या शेतीला पूरक व फायदेशीर आहे उंदीर, बेडूक , विविध प्रकारची किटके यांपासून पिकाचे संरक्षण करण्याचे काम करतात. म्हणून सापाला मारू नका त्यांना जगवा व निसर्ग वाचवा कारण तो शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे असे प्रतिपादन सर्पमित्र राहुल अवचिते यांनी केले.
वन्यजीव रक्षक संदीप गव्हाणे यांनी विशेष सहकार्य केले . आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नागाला देवता मानले जाते. सापांविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर मत मतांतरे असून ती चुकीची आहे. सापांना न घाबरता त्यांना अभय दिले पाहिजे. कारण ते एक प्रकारे आपल्याला मदतच करत असतात विषारी सापांपासून सावध राहावे बिनविषारी सापांना मारू नका असे आवाहन सेकंड स्कूलचे संचालक , शिरूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष , प्राचार्य तुकाराम बेनके यांनी केले.
याप्रसंगी दैनिक सकाळचे नवनियुक्त पत्रकार प्रमोल कुसेकर यांचा सन्मान करण्यात आला. प्रा संतोष शेळके यांनी शुभेच्छारुपी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य संभाजी कुटे, दिलीप वाळके , अंबादास गावडे , संतोष हिंगे, नवनाथ डुबे, सतीश अवचिते , अनिकेत बेनके , सुप्रिया काळभोर, ज्योती गजरे, रवींद्र चौधरी, शरद शेलार, बाबू मगर, मच्छिंद्र बेनके , लक्ष्मण हरिहर, विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोरक्षनाथ डुबे व आभार नितीन गरुड यांनी मानले.