जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
शनिवार दिनांक ९ मार्च २0२४ रोजी लेण्याद्री येथील गिरजा मंगल कार्यालयात जुन्नर तालुक्यातील १०१ दिव्यांग बांधवांना डिसेंट फाउंडेशन,पुणे यांच्या सहकार्याने आणि गेल इंडिया लिमिटेड या संस्थेच्या सी.एस.आर.फंडातून मोफत तीन चाकी सायकलींचे वाटप ह.भ.प.डॉ. पंकज महाराज गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सुवर्णपदक विजेती आंतरराष्ट्रीय खेळाडू गायत्री भालेराव आणि खेलो इंडिया पॅरागेम्स खेळाडू राघव बारवकर यांनी दिव्यांग क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या यशाची प्रेरणा घेऊन जुन्नर तालुक्यातून ही दिव्यांग क्रीडा क्षेत्रात नवे खेळाडू तयार होतील असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी भाषाप्रभु ह.भ.प.डॉ. पंकज महाराज गावडे तर अध्यक्ष म्हणून फोरकास्ट ॲग्रोटेक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड चे डॉक्टर संतोष सहाणे उपस्थित होते.उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर,जय हिंद कॉलेजचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ,समर्थ कॉलेजचे सेक्रेटरी वल्लभ शेळके ,दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे,डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,अध्यक्ष महेंद्र बिडवई,उपाध्यक्ष योगेश धर्मे,संचालक आदिनाथ चव्हाण, संतोष यादव, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष मनोज हाडवळे,सकाळ समूहाचे गणेश कदम, आदर्श सरपंच संतोष टिकेकर, अरविंद वळसे पाटील ,लायन्स क्लब जुन्नर चे अध्यक्ष योगेश रायकर, राधेश्याम दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, पुष्पाताई गोसावी, रमेश कोल्हे, जयवंत डोके, काशिनाथ लोखंडे,दीपक कोकणे,मुकुंद राक्षे,विकास ताम्हाणे,संतोष रघतवान,पांडुरंग तोडकर,गणेश मेहेर, सत्यवान खंडागळे,संतोष परदेशी,आदी मान्यवर नागरिक व दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
:–:- –दिव्यांगांचे कौशल्य गुण ओळखून त्यांना प्रशिक्षित केले तर त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू किंवा सेवा त्यांना आत्मनिर्भर बनवतील. यासाठी समर्थ व जयहिंद या दोन्ही शैक्षणिक संस्थांनी डिसेंट फाउंडेशनच्या सोबतीने दिव्यांगांसाठी चे प्रशिक्षण केंद्र उभारावे.
:-ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे:-
:-डिसेंट फाउंडेशन व गेल इंडिया लि. च्या माध्यमातून दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या सायकलीमुळे त्यांच्या स्वप्नांना नवीन बळ मिळेल. या उपक्रमातून दिव्यांग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नवीन प्रेरणा घेऊन कला, क्रीडा किंवा रोजगाराच्या क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवल्यास खऱ्या अर्थाने उपक्रमाचा उद्देश सफल होईल.
:–डॉ.संतोष सहाणे–: