शिरूर प्रतिनिधी – शकील मनियार
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सुजाता रासकर यांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सुजाता रासकर यांनी आपल्या कवीच्या माध्यमातून ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळविला महाराष्ट्रातला कवी या ऑनलाइन काव्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला शाळेमध्ये ज्ञानदानाचे काम गेले 38 वर्षे केले अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी घडविण्याचे काम केले त्यांचे विद्यार्थी चांगल्या पदावरती काम करत आहेत पर्यावरण संस्थेमध्ये महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून काम पाहतात अंध, अपंग, मतिमंद,शाळेतील मुलांना मदत करण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरूर तालुक्याच्या वतीने त्यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 2024 चा स्त्री शक्ती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पीआय ज्योतीराम गुंजवटे द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, अहमदनगर खरेदी विक्री संघाचे संचालक बाबासाहेब काळे, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत साठे,पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान, तालुकाध्यक्ष शकील मणियार ,तालुका उपाध्यक्ष विवेकानंद फंड माजी आदर्श सरपंच तात्यासाहेब सोनवणे, ॲड. रवींद्र खांडरे माजी उपसरपंच निलेश सोनवणे, युवा उद्योजक कमलेश बुऱ्हाडे ,पत्रकार फैजल पठाण ,पत्रकार फिरोज सिकलकर, संचालक संतोष लटांबळे आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.